त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना
ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘चिपको’ आंदोलनाची सुरूवात.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह
ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.
नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.
गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ‘दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
(मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)
महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, कादंबरीकार व लघुकथाकार, हिंदी साहित्याच्या छायावादी परंपरेतील चार आधारस्तंभांपैकी एक स्तंभ, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ‘यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) देण्यात आला.
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
(Image Credit: Wikipedia)
सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १९ जुलै १९६५)
रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी
(मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
माणिकराव गोडघाटे ऊर्फ ‘ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी
(जन्म: १० मे १९४०)
बाबुराव बागूल – दलित साहित्यिक
(जन्म: १७ जुलै १९३०)
गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या
(जन्म: ? ? ????)
आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
(जन्म: ११ डिसेंबर १९४२)
नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती
(जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
के. के. हेब्बर – चित्रकार
(जन्म: ? ? १९११)
डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक, अमेरिकेचे संरक्षण राज्यमंत्री (Deputy Secretary of Defense)
(जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
(Image Credit: Wikipedia)
अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ‘हिंद महिला समाज’च्या संस्थापिका
(जन्म: १७ सप्टेंबर १८८२)
लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. स्वर्गात मी नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.
(जन्म: १६ डिसेंबर १७७०)
This page was last modified on 10 September 2021 at 11:13am