देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ‘शिवसमर्थ पुरस्कार’ प्रदान
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ‘सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक
(मृत्यू: ११ जुलै २००३)
शिरीष पै – कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या. शिरीष पै यांचे ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ असे अनेक कवितासंग्रह वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘लाल बैरागीण’, ‘हेही दिवस जातील’ या कादंबऱ्यांचे लेखनही शिरीष पै यांनी केले आहे. ‘आईची गाणी’, ‘बागेतील जमती’ या बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘हायकू’ हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. शिरीष पै यांनी सिनेमांचे परीक्षणही केले आहे. नर्गीस, राज कपूर, बलराज सहानी, वसंत देसाई अशा नामवंत कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या आहेत. त्या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.
(मृत्यू: २ सप्टेंबर २०१७)
(Image Credit: दैनिक प्रहार)
उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक
(मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)
दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ‘डी. डी’ – संगीतकार
(मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)
एर्विन रोमेल – जर्मन सेनापती
(मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)
गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
(मृत्यू: २३ जून १९३९ - भावनगर, गुजराथ
बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक
(मृत्यू: ९ जून १९००)
विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला.
(मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)
सईद जाफरी – अभिनेता
(जन्म: ८ जानेवारी १९२९)
कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष
(जन्म: ? ? १९३१)
डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)
विनायक नरहरी तथा आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, तत्त्वज्ञ, भारतरत्न (१९८३ मरणोत्तर), १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.
(जन्म: ११ सप्टेंबर १८९५ - गागोदे, पेण, रायगड)
(Image Credit: Wikipedia)
नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी
(जन्म: १९ मे १९१०)
नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
(जन्म: ?? ???? १९२५)
योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: २७ डिसेंबर १५७१)
This page was last modified on 09 September 2021 at 11:24pm