-: दिनविशेष :-

१३ नोव्हेंबर

सहकार दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९४

स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

१९७०

बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

१९१३

रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ला नोबेल पारितोषिक

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६७

जूही चावला – अभिनेत्री

१९१७

वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ
(मृत्यू: १ मार्च १९८९)

१९१७

गजानन माधव मुक्तिबोध

गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४ - हबीबगंज, भोपाळ, मध्य प्रदेश)

(Image Credit: Wikipedia)

१८९८

इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती
(मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)

१८७३

बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
(मृत्यू: १० मार्च १९५९)

१८५५

गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते.
(मृत्यू: १४ जून १९१६)

१८५०

आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
(मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)

१७८०

महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक
(मृत्यू: २७ जून १८३९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते
(जन्म: ? ? १९२५)

२००१

अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ‘दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
(जन्म: १५ ऑगस्ट १९१७)

१९५६

इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार
(जन्म: १ नोव्हेंबर १८९३ - मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)

१७४०

कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ‘हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
(जन्म: ? ? १६७४)Pageviews

This page was last modified on 10 September 2021 at 11:34am