लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड
सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.
मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.
नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना
दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला. लेनिनग्राडची पूर्ण घेराबंदी करणारा हा वेढा २ वर्षे, ४ महिने, २ आठवडे आणि ५ दिवस टिकला. पुढे जर्मन सैन्याची सर्वत्र पीछेहाट व्हायला लागल्यावर २७ जानेवारी १९४४ रोजी तो काढण्यात आला. यात शहरातील अनेक लोक उपासमारीने मेले.
ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांचा मुलगा सीताराम रंगो यांच्यासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आले.
विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी
आशा भोसले – गेली सत्तर वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्या प्रसिद्ध पार्श्वगायिका. त्यांनी विविध भाषांत ११,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(Image Credit: The Indian Express)
भूपेन हजारिका – संगीतकार, गीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माते. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल राष्ट्रीय पारितोषिक (१९७५), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मश्री (९१८७), दादासाहेब फाळके पारितोषिक (१९९२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००८), पद्मविभूषण (२०१२ - मरणोत्तर), भारतरत्न (२०१७ - मरणोत्तर). भारतीय जनता पक्षाचे नेते.
(मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)
(Image Credit: Wikipedia)
रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत व निष्णात वकील, दोन वेळा लोकसभा खासदार (वायव्य मुंबई), पाच वेळा राज्यसभा खासदार, वयाच्या १७ व्या वर्षीच ते एल. एल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
(जन्म: १४ सप्टेंबर १९२३ - शिकारपूर, पाकिस्तान)
(Image Credit: nocorruption.in)
मुरली – तामिळ अभिनेता
(जन्म: १९ मे १९६४)
कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ
(जन्म: १८ जून १९११)
वामन रामराव तथा ‘वा. रा.’ कांत – भावकवी. त्यांची ‘सखी शेजारिणी तू हसत रहा’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’, ‘बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ इ. भावगीते लोकप्रिय आहेत. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे ‘वेलांटी’, ‘पहाटतारा’, ‘शततारका’, ‘रुद्रवीणा’, ‘दोनुली’, ‘मरणगंध’ इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले.
(जन्म: ६ आक्टोबर १९१३ - नांदेड)
(Image Credit: Internet)
शेख मुहम्मद अब्दुल्ला – ‘शेर - ए - कश्मीर’ भारतात विलीन झाल्यानंतरचे जम्मू काश्मीरचे पहिले निर्वाचित पंतप्रधान (कार्यकाल: ९ मार्च १९४८ ते ९ ऑगस्ट १९५३), जम्मू काश्मीरचे तिसरे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ फेब्रुवारी १९७५ ते २६ मार्च १९७७ आणि ९ जुलै १९७७ ते ८ सप्टेंबर १९८२)
(जन्म: ५ डिसेंबर १९०५)
(Image Credit: Wikipedia)
निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी
(जन्म: १७ एप्रिल १८९७)
फिरोझ जहांगीर घंडी तथा फिरोझ गांधी – १९५० ते १९५२ मधील हंगामी संसद सदस्य,पहिल्या (प्रतापगढ, उत्तर प्रदेश) व दुसऱ्या (रायबरेली, उत्तर प्रदेश) लोकसभेतील खासदार, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी, द नॅशनल हेराल्ड आणि द नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक
(जन्म: १२ सप्टेंबर १९१२)
(Image Credit: Wikipedia)
पोप सर्गिअस (पहिला) –
(जन्म: १५ डिसेंबर ६८७)
This page was last modified on 12 September 2021 at 8:19pm