-: दिनविशेष :-

५ नोव्हेंबर

मराठी रंगभूमी दिन

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ‘अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, (१९९५), दिलीप प्रभावळकर (२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर(२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४) आदींना मिळाला आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९५१

बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन ‘पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.

१९४५

कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१८७२

महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

१८४३

विष्णूदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

१८२४

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

१८१७

इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

करण थापर – पत्रकार

१९३०

अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(मृत्यू: ४ मार्च २०११)

१९२९

प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी
(मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

१९१७

बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
(मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

१९१३

विवियन ली
गॉन विथ द विंड (१९३९) या चित्रपटात ‘स्कार्लेट-ओ-हारा’ च्या भूमिकेत

विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री
(मृत्यू: ८ जुलै १९६७)

(Image Credit: Wikipedia)

१९०८

प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ‘न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८).
(मृत्यू: ८ जुलै २००६ - ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

१८८५

विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

१८७०

देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ‘चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले आहे.
(मृत्यू: १६ जून १९२५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

भूपेन हजारिका
२०१६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

भूपेन हजारिका – संगीतकार, गीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माते. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल राष्ट्रीय पारितोषिक (१९७५),संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मश्री (९१८७), दादासाहेब फाळके पारितोषिक (१९९२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००८), पद्मविभूषण (२०१२ - मरणोत्तर), भारतरत्न (२०१७ - मरणोत्तर). भारतीय जनता पक्षाचे नेते.
(जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

(Image Credit: Wikipedia)

१९९१

शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या ‘किती रंगला खेळ’, ‘चंदनाची उटी’, ‘कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्‍या आणि ‘झपूर्झा’, ‘सावलीचा चटका’, ‘मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
(जन्म: ? ? १९३०)

१९५०

फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ‘प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या.
(जन्म: ? ? १८८०)

१९१५

सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक
(जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१८७९

जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ
(जन्म: १३ जून १८३१ - एडिंबर्ग, यु. के.)

भरा

भरा



Pageviews

This page was last modified on 04 September 2021 at 6:42pm