-: दिनविशेष :-

२४ जुलै


महत्त्वाच्या घटना:

२००५

लान्स आर्मस्ट्राँगने ‘टूर-डी-फ्रान्स’ ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.

२००१

जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.

२०००

विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे? तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्‍कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.

१९९८

परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

१९९७

माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान ‘भारतरत्‍न’ प्रदान

१९९७

ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

१९९१

अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा? अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

१९९०

इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.

१९७४

वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.

१९६९

सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.

१९४३

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले (ऑपरेशन गोमोरा). हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.

१९३१

पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.

१८२३

चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

१७०४

ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला, जो आजपर्यंत सोडलेला नाही.

१५६७

स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९

जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका

१९४७

जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज

१९४५

अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ‘विप्रो’ (WIPRO)चे चेअरमन

१९२८

केशुभाई पटेल

केशुभाई पटेल – गुजरातचे १० वे मुख्यमंत्री (१४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९५), ६ व्या लोकसभेतील खासदार (जुनागढ) आणि राज्यसभा सदस्य (१० एप्रिल २००२ ते ९ एप्रिल २००८), पद्मभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२०)

(Image Credit: OpIndia!)

१९११

अमल ज्योती तथा ‘पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
(मृत्यू: २० एप्रिल १९६०)

१९११

गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी
(मृत्यू: ? ? ????)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८०

उत्तम कुमार

अरुण कुमार चटर्जी तथा ‘उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते
(जन्म: ३ सप्टेंबर १९२७)

(Image Credit:  @Bollywoodirect)

१९८०

पीटर सेलर्स
‘द पिंक पॅन्थर’ या चित्रपटात

पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक
(जन्म: ८ सप्टेंबर १९२५)

(Image Credit: Wikipedia)

१९७४

सर जेम्स चॅडविक

सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २० आक्टोबर १८९१ - बॉलिंग्टन, चेशायर, इंग्लंड)

(Image Credit: Wikipedia)

११२९

शिराकावा – जपानी सम्राट
(जन्म: ७ जुलै १०५३)



Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 9:13pm