’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले. (Docking)
भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.
व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला. या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. [चैत्र शु. ८]
पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
छत्रपती शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. [चैत्र व. ७]
दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू व प्रबंधक
रोमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली.
(मृत्यू: १७ जानेवारी २०१४ - कोलकता, पश्चिम बंगाल)
जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ
विष्णू महेश्वर ऊर्फ ‘व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक
(मृत्यू: २८ जून २०००)
रघुनाथ विष्णू पंडित – कोंकणी कवी
(मृत्यू: ? ? ????)
‘काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी
(मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.
(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)
(Image Credit: Mohan Nadkarni)
अली सिकंदर ऊर्फ ‘जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर
(मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ
(मृत्यू: २३ जून १८३६)
आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
(जन्म: २ जानेवारी १९२०)
पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
(जन्म: ७ मे १९१२ - मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण
(जन्म: १० जून १९०८)
शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
विनायक महाराज मसूरकर – धर्मभास्कर [चैत्र पौर्णिमा शके १८७७]
(जन्म: ? जानेवारी १८८९ - पौष वद्य ४, शके १८१०)
रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ८ सप्टेंबर ११५७)
This page was last modified on 21 September 2021 at 11:07pm