बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक
चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
सामोआचा संयुक्त राष्ट्र संघटनेत (United Nations) प्रवेश
टी. एन. शेषन – भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त (कार्यकाल: १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६), अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
(मृत्यू: १० नोव्हेंबर २०१९)
(Image Credit: Wikipedia)
इरावती कर्वे – साहित्य अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, ललित निबंधकार. त्यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच ‘परांजपे व्याख्यानमाला’ व ‘हिंदूंची समाजरचना’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. ‘भारतीय संस्कृती’, ‘महाराष्ट्र समाज व संस्कृती’, ‘महाभारत-रामायण’ ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगान्त’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र एक अभ्यास’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ तर ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
स्वामी स्वरुपानंद
(मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)
(मृत्यू: ६ जून १९७६)
हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
(मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
पोप सर्गिअस (पहिला)
(मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
रोमन सम्राट नीरो याचा जन्म
(मृत्यू: ९ जून ६८)
शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९००)
वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ‘मिकी माऊस’चे जनक
(जन्म: ५ डिसेंबर १९०१)
वल्लभभाई झंवरभाई पटेल तथा सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१)
(जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
(Image Credit: Wikipedia)
छत्रपती शाहू महाराज
(जन्म: १८ मे १६८२)
This page was last modified on 14 December 2021 at 6:42pm