अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ‘माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर
ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
‘अपोलो-१३’ हे अंतराळयान चांद्रमोहीम अर्ध्यावर सोडून सुखरुप पृथ्वीवर परतले.
पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.
बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.
[चैत्र व. ८]
दिनेश मोंगिया – क्रिकेटपटू
मुथैय्या मुरलीधरन – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
गीत सेठी – बिलीयर्डसपटू
बिंदू – चित्रपट अभिनेत्री
सिरीमावो बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ‘सिलोन’ हे नाव बदलून ‘श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलकंपन्या, रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.
(मृत्यू: १० आक्टोबर २०००)
अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९८१)
निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)
यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्याने त्यांनी ‘महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ‘महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
(मृत्यू: २१ मार्च १९७३)
जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार
(मृत्यू: ३१ मार्च १९१३)
संत सूरदास – हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य
(मृत्यू: ? ? १५७३)
विनायक आदिनाथ तथा ‘वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
(जन्म: ४ जुलै १९२६)
सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री
(जन्म: १८ जुलै १९७२)
डॉ. वामन दत्तात्रय तथा ‘वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक
(जन्म: १९ आक्टोबर १९२५)
बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
(जन्म: ५ मार्च १९१६)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ‘शिक्षक दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
(जन्म: ५ सप्टेंबर १८८८)
व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते
(जन्म: २२ सप्टेंबर १८६९)
बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी
(जन्म: १७ जानेवारी १७०६)
This page was last modified on 10 October 2021 at 11:07am