-: दिनविशेष :-

१९ मे

जागतिक काविळ दिन


महत्त्वाच्या घटना:

१९५०

इस्रायली जहाजांना किंवा इस्रायलशी व्यापार करणाऱ्या जहाजांना सुएझ कालव्यातून जाण्यास मनाई असल्याचे इजिप्तने जाहीर केले.

१९१०

हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.

१९०६

Simplon Tunnel
उत्तरेकडील प्रवेशद्वार

आल्प्स पर्वतातून इटली आणि स्वित्झर्लंड यांना जोडणाऱ्या १९.८ किमी लांबीच्या जगातील (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याचे (Simplon Tunnel) उद्घाटन झाले.

(Image Credit: Wikipedia)

१५३६

अ‍ॅन बोलेनचा शिरच्छेद

इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री याची (दुसरी) बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.

(Image Credit: onthisday.com)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४

नवाज़ुद्दीन सिद्दीकी
NSD मधील एका नाटकात

नवाज़ुद्दीन सिद्दीकी – बॉलीवूड मधील अभिनेता. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून (NSD) अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या सिद्दिकीने २०१९ च्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमात स्वतः बाळासाहेबांची भूमिका केली आहे. १९९९ सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटी भूमिका करून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शूल, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., आजा नचले, न्यू यॉर्क इत्यादी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या सिद्दिकीला २०१२ साली विद्या बालन बरोबरच्या कहानी ह्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश इत्यादी चित्रपटांत त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. तलाशमधील भूमिकेसाठी त्याला झी सिने पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार इत्यादी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. प्रशांत भार्गव यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘पतंग’ (२०११) या चित्रपटात नवाजुद्दीन याने त्याची प्रथम प्रमुख भूमिका साकारली. २०१३ मध्ये आलेल्या द लंचबॉक्स या चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्दिकीला ‘फिल्मफेअर’चा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला. २०१५ मधील बजरंगी भाईजान, बदलापूर ह्या चित्रपटांद्वारे सिद्दिकीची प्रसिद्धी अजूनच वाढली.

(Image Credit:  Bollywoodirect)

१९६४

मुरली – तामिळ अभिनेता
(मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)

१९३८

गिरीश कर्नाड – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक
(मृत्यू: १० जुन २०१९)

१९३४

रस्किन बॉन्ड
डेहराडून (१९५०)

रस्किन बॉन्ड – भारतात स्थायिक झालेले ब्रिटिश लेखक. पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१४), ‘आवर ट्रीज स्टिल ग्रो इन देहरा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२). शशीकपूर व शाम बेनेगल यांचा ‘जुनून’ हा चित्रपट त्यांच्या ‘अ फ्लाईट ऑफ पिजन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘७ खून माफ़’ हा २०१४ मधील विशाल भारद्वाज यांचा चित्रपट ‘सुसाना'ज सेव्हन हसबंड्स’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘अ नाईट ट्रेन अ‍ॅट देवळी अँड आदर स्टोरीज’, ‘द रुम ऑन द रूफ’, ‘द ब्लू अंब्रेला’, ‘देल्ही इज नॉट फार’ ‘द इंडिया आय लव्ह’ ‘टाइम स्टॉप्स ॲट शामली’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. लहान मुलांसाठीही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

(Image Credit: memsaab.com)

१९२६

स्वामी क्रियानंद – आध्यात्मिक गुरू आणि लेखक

१९२५

पॉल पॉट – कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ‘ख्मेर रुज’चा नेता
(मृत्यू: १५ एप्रिल १९९८)

१९२५

‘माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)

१९१३

नीलम संजीव रेड्डी
अधिकृत छायाचित्र (१९७७)

नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती (कार्यकाल: २५ जुलै १९७७ ते २४ जुलै १९८२), लोकसभेचे ४ थे सभापती (कार्यकाल: १७ मार्च १९६७ ते १७ जुलै १९६९ आणि २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७), केंद्रीय मंत्री व (अविभाजित) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (कार्यकाल: १ नोव्हेंबर १९५६ ते ११ जानेवारी १९६० आणि १२ मार्च १९६२ ते २० फेब्रुवारी १९६४), स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते
(मृत्यू: १ जून १९९६ - बंगळुरू)

(Image Credit: Wikipedia)

नीलम संजीव रेड्डी यांचा अल्पपरिचय करून देणारा व्हिडीओ (०३:५२):

१९१०

नथुराम गोडसे
(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)

१८९०

हो ची मिन्ह

हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती
(मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)

(Image Credit: Encyclopedia Britannica)

१८८१

मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
(जन्म: ७ जानेवारी १९२८ कोल्हापूर, महाराष्ट्र)

१९९९

प्रा. रमेश तेंडुलकर – काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक. सचिन तेंडुलकरचे वडील
(जन्म: ? ? १९३४)

१९९७

शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार, रंगभूमीचे ‘भीष्माचार्य’
(जन्म: २२ ऑगस्ट १९१५)

१९९५

पं. विनयचंद्र मौदगल्य – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ, त्यांनी १९३९ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची दिल्ली येथे स्थापना केली.
(जन्म: २ एप्रिल १९१८)

१९६९

पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर – इतिहास व पुराणसंशोधक, ताम्रपट व महानुभाव लिपितील तज्ञ, भारत इतिहास संशोधन मंडळात काम करत असताना ‘शिवशाहीचा लेखनालंकार’ हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.
(जन्म: ? ? ????)

१९६५

मालागासी येथील ‘तुई मलिला’ या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू
(जन्म: ?? १७७७)

१९५८

सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
(जन्म: १० डिसेंबर १८७०)

१९०४

जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक
(जन्म: ३ मार्च १८३९)

१२९७

संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई हिने एदलाबाद येथे समाधी घेतली. [वैशाख व. १२, शके १२१९]
(जन्म: ? ? १२७९)Pageviews

This page was last modified on 31 August 2021 at 12:20pm