-: दिनविशेष :-

८ ऑगस्ट

भारत छोडो दिन


महत्त्वाच्या घटना:

२००८

चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२०००

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर

१९९८

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

१९९४

पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

१९८५

भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ‘ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

१९७४

वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

१९६७

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी (ASEAN) ची स्थापना केली.

१९६३

इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

१९४२

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ‘चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

१६४८

स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फतेहखान यांच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू

१९४०

दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
(मृत्यू: २ जुलै २००७)

१९३२

दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
(मृत्यू: १४ मार्च १९९८)

१९२६

शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ‘बालभारती’चे संपादक. त्यांचे ‘चोरा मी वंदिले’, ‘सागराचे पाणी’, ‘सवाल’, ‘बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ‘सरपंच’, ‘इशारा’, ‘घुंगरू’, ‘कुलवंती’, ‘बेईमान’, ‘ललाट रेषा’, ‘सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.
(मृत्यू: ३० जुलै १९९४)

१९२५

डॉ. वि. ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार (१९७३ - १९७५), पद्मश्री
(मृत्यू: ? जून २००६)

१९१२

बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
(मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

१९१२

तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज
(मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९०२

पॉल डायरॅक
१९३३ मधील छायाचित्र

पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते (१९३३ - इर्विन श्रॉडिंगर बरोबर संयुक्तपणे) इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २० आक्टोबर १९८४ - टालाहासी, फ्लोरिडा, यु. एस. ए.)

(Image Credit: Wikipedia)

१८७९

डॉ. बॉब स्मिथ – ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक
(मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

१०७८

होरिकावा – जपानी सम्राट
(मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

१९९८

डॉ. सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी ‘सीमारेषा’, ‘अनुहार’, ‘मेघमल्हार’, ‘वृंदा’, ‘युगंधरा’, ‘महाश्वेता’ आदी चौदा कादंबर्‍या, दोन नाटके व काही कथा लिहिल्या.
(जन्म: ? ? १९१५)

१८९७

व्हिक्टर मेयर

व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ. वाफेची घनता निश्चित करण्यासाठी त्यांनी एक उपकरण (Viktor Meyer Apparatus) तयार केले.
(जन्म: ८ सप्टेंबर १८४८)

(Image Credit: Wikipedia)

१८२७

जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान
(जन्म: ११ एप्रिल १७७०)



Pageviews

This page was last modified on 19 October 2021 at 9:09pm