-: दिनविशेष :-

१० ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

१९९९

औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.

१९९९

इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर

१९९०

मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

१९८८

दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

१८२१

मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.

१८१०

स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.

१६७५

चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६०

देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष
(मृत्यू: १२ जुलै २००१)

१९१३

डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान
(मृत्यू: ८ मे २००३)

१९०२

नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री
(मृत्यू: १२ जून १९८३)

१८९४

व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
(मृत्यू: २३ जून १९८०)

१८७४

हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २० आक्टोबर १९६४)

१८६०

पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक
(मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)

१८५५

‘गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर - अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक
(मृत्यू: १६ मार्च १९४६)

१७५५

नारायण बाळाजी भट तथा नारायणराव पेशवा – ५ वा पेशवा
(मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

सुरेश पुरुषोत्तमदास दलाल
२००६ मधील छायाचित्र

सुरेश पुरुषोत्तमदास दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार (२००५) विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक, बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ११ आक्टोबर १९३२)

(Image Credit: Wikipedia)

१९९२

लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
(जन्म: १२ ऑगस्ट १९०६)

१९८६

जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती.
(जन्म: २७ जानेवारी १९२६)

१९८२

मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली.
(जन्म: १० एप्रिल १९२७)

१९८०

जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)

१९५०

खेमचंद प्रकाश

खेमचंद प्रकाश – संगीतकार
(जन्म: १२ डिसेंबर १९०७)

(Image Credit: Cinestaan)

१९४२

हुतात्मा शिरीषकुमार
(जन्म: २८ डिसेंबर १९२६)



Pageviews

This page was last modified on 12 December 2021 at 9:22pm