-: दिनविशेष :-

१६ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००१

नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार‘ प्रदान

२०००

हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ‘के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर

१९७६

इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

१९६६

अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: १६ मार्च १९६६ ते २९ जून १९६६)

१९४५

दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९४३

नई कहानी

‘प्रभात’चा ‘नई कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

(Image Credit: Cinestaan)

१६४९

शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१५२८

फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.
[चैत्र शु. १४]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३६

भास्कर चंदावरकर – संगीतकार
(मृत्यू: २६ जुलै २००९)

१९२१

फहाद – सौदी अरेबियाचा राजा
(मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९०१

प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: १२ जून १९८१)

१७८९

जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ६ जुलै १८५४)

१७५१

जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २८ जून १८३६)

१७५०

कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत.
(मृत्यू: ९ जानेवारी १८४८)

१६९३

मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी
(मृत्यू: २० मे १७६६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००७

मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू
(जन्म: ४ मे १९८४)

१९९९

कुमुदिनी पेडणेकर

कुमुदिनी पेडणेकर – गायिका
(जन्म: ? ? ????)

(Image Credit: आठवणीतली गाणी)

१९९९

कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका
(जन्म: ? ? ????)

१९९०

वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक
(जन्म: २१ जुलै १९१०)

१९४६

‘गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक
(जन्म: १० ऑगस्ट १८५५)

१९४५

गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ‘अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक
(जन्म: १३ जून १८७९)



Pageviews

This page was last modified on 13 June 2021 at 6:16pm