दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ‘यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
अवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्या महिला पंतप्रधान होत.
क्रिकेट – इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.
प्लासीची लढाई : ‘पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज-उद-दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.
झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू
डॉ. जब्बार पटेल मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीवरील प्रथितयश दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते. घाशीराम कोतवाल आणि तीन पैशांचा तमाशा या तुफान प्रसिद्धी मिळालेल्या नाटकांचे दिग्दर्शक. साखरसम्राटांच्या राजकारणावर आधारित सामना (१९७५) चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सिंहासन (१९७७), जैत रे जैत (१९७७), उंबरठा (१९८२), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९१) असे एकापेक्षा एक उत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सर लिओनार्ड तथा ‘लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)
(Image Credit: Wikipedia)
अॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ
(मृत्यू: ७ जुन १९५४)
वीर विक्रम शाह ‘त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
(मृत्यू: १३ मार्च १९५५)
राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
(मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)
रेमंड रसेल तथा रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, उजव्या हाताने गोलंदाजी करणारे जलदगती गोलंदाज
(जन्म: ३ आक्टोबर १९२१)
वसंत शांताराम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या ‘प्रेमसंन्यास’ या नाटकासाठी पदे लिहिली आहेत. विधिलिखित, अमृतसिद्धी (नाटके), मखमलीचा पडदा, नट-नाटक
आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा), बालगंधर्व-व्यक्ती व कला, महात्मा जोतीराव फुले (चरित्र), रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
(जन्म:
२७ डिसेंबर १९०४)
हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ‘साहिब, बिबी और गुलाम’, ‘बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते.
विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
(जन्म: २ एप्रिल१८९८ - हैदराबाद, आंध्र प्रदेश)
बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन
(जन्म: ? ? ????)
व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
(जन्म: १० ऑगस्ट १८९४)
यूथ काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन
(जन्म: १४ डिसेंबर १९४६)
(Image Credit: OneIndia.com)
डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
(जन्म: ६ जुलै १९०१)
गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
(जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ - चितल, अमरेली, गुजराथ)
जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ
(जन्म: ६ एप्रिल १७७३)
व्हेस्पासियन – रोमन सम्राट
(जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)
This page was last modified on 13 December 2021 at 8:53pm