-: दिनविशेष :-

१२ डिसेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००१

आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

१९११

दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

१९०१

जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

१७५५

डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

युवराजसिंग

युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू

(Image Credit: Cricket Country)

१९५५

चंदन मित्रा

चंदन मित्रा – पत्रकार, ‘द पायोनिअर’ या वृत्तपत्राचे संपादक, राज्यसभा खासदार, भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते. सर्व राजकीय पक्षांतील लोकांशी त्यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांची राज्यसभेतील भाषणे अत्यंत विद्वत्तापूर्ण आहेत. याखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा त्यांचा अभ्यास अफाट होता. त्यांच्या भाषणांत आणि लिखाणात त्याचा चपखलपणे उपयोग केलेला दिसतो.
(मृत्यू: २ सप्टेंबर २०२१)

(Image Credit: The Week)

१९५०

रजनीकांत

शिवाजीराव गायकवाड तथा रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते व निर्माते, दादासाहेब फाळके पुरस्कार (२०२०), पद्मविभूषण (२०१६), पद्मभूषण (२०००) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित

(Image Credit: Wikipedia)

१९४०

शरद पवार

शरदचंद्र गोविंदराव तथा शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

(Image Credit: Britannica)

१९१५

फ्रँक सिनात्रा

फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
(मृत्यू: १४ मे १९९८)

(Image Credit: USA Today)

१९०७

खेमचंद प्रकाश

खेमचंद प्रकाश – संगीतकार
(मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)

(Image Credit: Cinestaan)

१९०५

मुल्कराज आनंद

डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
(मृत्यू: २८ सप्टेंबर २००४ - पुणे)

(Image Credit: Wikipedia)

१८९२

गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ‘सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
(मृत्यू: ११ मार्च १९६५)

१८७२

डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ‘भोंसला मिलिटरी स्कूल‘चे संस्थापक
(मृत्यू: ३ मार्च १९४८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

पण्डित रवी शंकर – सतार वादक, ‘भारतरत्‍न’
(जन्म: ७ एप्रिल १९२०)

२००५

रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते
(जन्म: २९ डिसेंबर १९१७)

२०००

जे. एच. पटेल

जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९)
(जन्म: १ आक्टोबर १९३०)

(Image Credit: Wikipedia)

१९९२

पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक
(जन्म: १२ जानेवारी १९०६ - आंबेडे, सातेरी, गोवा)

१९९१

दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६)
(जन्म: ? ? ????)

१९६४

मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
(जन्म: ३ ऑगस्ट १८८६)

१९३०

परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू
(जन्म: ? ? १९०८)Pageviews

This page was last modified on 12 December 2021 at 9:19pm