-: दिनविशेष :-

२० आक्टोबर

जागतिक अस्थिसुषिरता दिन

World Osteoporosis Day


महत्त्वाच्या घटना:

२०११

लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

२००१

पंडित सत्यदेव दुबे

रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर

(Image Credit: FilmBees)

१९९५

देव आनंद

ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ‘मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर

(Image Credit: Original Copy)

१९९१

उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

१९७१

मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

१९७०

डॉ. नॉर्मन बोरलॉग

हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर

(Image Credit: The Nobel Prize)

१९६९

PDKV, Akola

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना

(Image Credit: iCNN)

१९६२

चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.

१९५२

केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

१९५०

कृ. भा. बाबर यांनी ‘समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.

१९४७

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९०४

चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८

वीरेन्द्र सहवाग

वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज

(Image Credit: New Indian Express)

१९६३

Embed from Getty Images
क्रिकेट विश्वचषक १९८७ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध

नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार

१९५७

कूमार सानू

केदारनाथ भट्टाचार्य तथा कुमार सानू – पार्श्वगायक, पद्मश्री (२००९)

१९१६

शाहीर अमर शेख

मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ‘शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९ - इंदापूर, पुणे)

(Image Credit: दैनिक लोकमत)

१८५५

गोवर्धनराम त्रिपाठी

गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ‘सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.
(मृत्यू: ४ जानेवारी १९०७ - मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१८९३

जोमो केन्याटा
१९६६ मधील छायाचित्र

जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: १२ डिसेंबर १९६४ ते २२ ऑगस्ट १९७८)
(मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

(Image Credit: Wikipedia)

१८९१

सर जेम्स चॅडविक

सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २४ जुलै १९७४ - केम्ब्रिज, इंग्लंड)

(Image Credit: The Nobel Prize)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

मुअम्मर गडाफी

मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा
(जन्म: ७ जून १९४२)

(Image Credit: Biography)

२०१०

पार्थसारथी शर्मा

पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू
(जन्म: ५ जानेवारी १९४८ - अलवर, राजस्थान)

(Image Credit: Cricket Country)

२००९

बाबा कदम

वीरसेन आनंदराव तथा ‘बाबा’ कदम – रहस्यकथा व गुप्तहेरकथालेखक
(जन्म: ४ मे १९२९)

(Image Credit: निखिल पिंपुटकर)

१९९९

माधवराव लिमये

माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
(जन्म: ? ? १९१५ - पुणे)

(Image Credit: nashik.com)

१९९६

पहिले महायुद्ध : दि. वि. गोखले यांनी लिहिलेले पुस्तक

दिनकर विनायक तथा ‘बंडोपंत’ गोखले – सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
(जन्म: २५ मार्च १९२३)

१९८४

पॉल डायरॅक
१९३३ मधील छायाचित्र

पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते (१९३३ - इर्विन श्रॉडिंगर बरोबर संयुक्तपणे) इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ८ ऑगस्ट १९०२ - ब्रिस्टॉल, इंग्लंड)

(Image Credit: Wikipedia)

१९७४

मास्टर कृष्णराव

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ‘मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ‘वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली.
(जन्म: २० जानेवारी १८९८)

(Image Credit: CHILOKA)

१९६४

हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १० ऑगस्ट १८७४)

१९६१

व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली.
(जन्म: ? ? ????)

१८९०

सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर
(जन्म: १९ मार्च १८२१)Pageviews

This page was last modified on 19 October 2021 at 11:34pm