ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.
मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
(मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९)
वीरेंद्र – नेपाळचे राजे
(मृत्यू: १ जून २००१)
ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री (२००६ - २०१४),
रतन टाटा – उद्योगपती
हुतात्मा शिरीषकुमार
(मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी,
उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.
(मृत्यू: १६ मे १९९४)
गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पारितोषिक (१९१९) विजेते
(मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
(जन्म: २४ जानेवारी १९२४ - वेंगुर्ला)
हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
(जन्म: ? ? १९०९)
सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी
(जन्म: २० मे १९००)
आबालाल रहमान – चित्रकार
(जन्म: ? ? १८६०)
फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २ एप्रिल १६१८)