श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
१२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
सचिन तेंडुलकर याला ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कार जाहीर
जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ‘जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या
अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी
राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ‘राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
शिवराम महादेव परांजपे यांनी ‘स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
प्रवीण ठिपसे – बुद्धीबळपटू, ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय, भारताचा तिसरा ग्रँडमास्टर (१. विश्वनाथन आनंद २. दिव्येंदू बारुआ), अर्जुन अवॉर्ड विजेता (१९८४), ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद (१९८२, १९८४, १९८५, १९८९, १९९२ १९९३ आणि १९९४), चेस ऑलीम्पियाडस मध्ये ७ वेळा भारताचे प्रतिनिधित्व (१९८२, १९८४, १९८८, १९९२, १९९४, १९९८ आणि २००२), सर्वोच्च फिडे रेटिंग २५१५ (१९९५)
(Image Credit: sportskeeda.com)
फकिरा मुंजाजी तथा ‘फ. मुं.’ शिंदे – कवी, समीक्षक व अनुवादक
बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे
हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)
मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)
डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
(मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)
लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना
मिळाले होते.
(मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)
एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
(मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)
आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ जानेवारी १९६१)
सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
(मृत्यू: २१ जानेवारी १९५९)
बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार,वाड्मयविवेचक
(मृत्यू: ? ? ????)
जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ‘कॅडबरी‘ चे संस्थापक
(मृत्यू: ११ मे १८८९)
लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते
(जन्म: १२ एप्रिल १९३२)
आनंदीबाई जयवंत – कवी, समीक्षक व अनुवादक
(जन्म: ? ? ????)
हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते
(जन्म: १६ मे १९०५)
दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ‘भाऊसाहेब‘ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
(जन्म: १२ मार्च १९११)
बाळशास्त्री व्यंकटेश हरदास – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
(जन्म: ? ? ????)
इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ‘जेम्स बाँड’चा जनक
(जन्म: २८ मे १९०८)
This page was last modified on 11 May 2021 at 11:03am