-: दिनविशेष :-

१६ सप्टेंबर

जागतिक ओझोन संरक्षण दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९७

संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर

१९९७

आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.

१९७५

पापुआ न्यू गिनीचा ध्वज

पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Britannica)

१९४५

दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली

१९३५

बँक ऑफ महाराष्ट्र

इंडियन कंपनीज अ‍ॅक्ट अन्वये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.

(Image Credit: Bank of Maharashtra)

१९०८

‘जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.

१६२०

मेफ्लॉवर
बर्नार्ड ग्रीबल याने काढलेले तैलचित्र

‘मेफ्लॉवर’ जहाजाने इंग्लंडमधील साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले. सुमारे दहा आठवडे अतिशय खडतर प्रवास करून १०२ प्रवासी व ३० खलाशांसह हे जहाज २१ नोव्हेंबर १६२० रोजी अमेरिकेतील केप कॉड, मॅसेच्युसेट्स येथे पोचले. हे अमेरिकेत पोहोचलेले पहिले वसाहतवादी होते.

(Image Credit: Britannica)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

डेव्हिड कॉपरफिल्ड
२०१० मधील छायाचित्र

डेव्हिड सेथ कोटकिन तथा ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ – अमेरिकन जादूगार व दृष्टीविभ्रमकार

(Image Credit: विकिपीडिया)

१९५४

पं. संजय बंदोपाध्याय

पं. संजय बंदोपाध्याय (बॅनर्जी) – सतारवादक

(Image Credit: Wikipedia)

१९४२

ना. धों. महानोर

नामदेव धोंडो तथा ‘ना. धों.’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, विधानपरिषदेचे सदस्य. त्यांना ‘पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने (१९९१) गौरविण्यात आले आहे.

(Image Credit:  @NDMahanor)

१९४२

विजय पाटील

विजय पाटील – ‘राम-लक्ष्मण’ या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील ‘लक्ष्मण’. संगीतसंयोजक, पियानो आणि अ‍ॅकार्डिअन वादक. त्यांच्या कारकिर्दीची सुरवात दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ (१९७५) या चित्रपटापासून झाली. यानंतरच्या दादा कोंडके यांच्या सर्व चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक तेच होते. ‘एजंट विनोद’ (१९७७) या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या काळात त्याचे सहकारी राम (सुरेंद्र) यांचे निधन झाले. परंतु त्यांनी ‘राम-लक्ष्मण हेच नाव कायम ठेवले. राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याना हिंदीत मोठे यश मिळवून दिले. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. ‘हमसे बढकर कौन?’, ‘हम से हैं जमाना’, ‘वो जो हसीना’, ‘दीवाना तेरे नाम का’, ‘हम आपके हैं कौन?’, ‘हम साथ साथ हैं’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
(मृत्यू: २२ मे २०२१)

(Image Credit: India Today)

१९१६

एम. एस. सुब्बुलक्ष्मी

एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका. पद्मभूषण (१९५४), रॅमन मॅगसेसे पारितोषिक (१९७१) मिळालेल्या संगीतक्षेत्रातील प्रथम व्यक्ती, पद्मविभूषण (१९७५), कालिदास सन्मान (१९८८), भारतरत्‍न (१९९८)
(मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

(Image Credit: The Quint)

१९१३

कमलाबाई ओगले

कमलाबाई कृष्णाजी ओगले – ‘रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
(मृत्यू: २० एप्रिल १९९९)

(Image Credit: Bytes of India)

१९०७

वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(मृत्यू: २५ मार्च १९९१)

१३८६

हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)

१३८०

चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २१ आक्टोबर १४२२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत.
(जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

१९७७

केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: १३ जुलै १८९२)

१९७३

पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.
(जन्म: ? ? ????)

१९६५

फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते
(जन्म: ३१ जुलै १८८६)

१९३२

सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर
(जन्म: १३ मे १८५७ - आल्मोडा, उत्तराखंड)

१८२४

लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

१७३६

डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ
(जन्म: २४ मे १६८६)Pageviews

This page was last modified on 16 September 2021 at 3:17pm