-: दिनविशेष :-

२९ जून


महत्त्वाच्या घटना:

२००२

लालकृष्ण अडवाणी यांनी भारताचे ७ वे उपपंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
[कार्यकाल: २९ जून २००२ ते २२ मे २००४ (१ वर्ष ३२८ दिवस)]

२००१

ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर

२००१

पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ‘नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

१९९५

दक्षिण कोरियातील सेऊल येथे ‘सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.

१९७६

सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८७१

ब्रिटिश संसदेने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५

चंद्रिका कुमारतुंगा

चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा (१२ नोव्हेंबर १९९४ ते १९ नोव्हेंबर २००५), श्रीलंकेच्या पंतप्रधान (१९ ऑगस्ट १९९४ ते १२ नोव्हेंबर १९९४), श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या समन्वयक

(Image Credit: Recently Heard)

१९३४

कमलाकर सारंग

कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक
(मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)

१९०८

प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज
(मृत्यू: १९ जुलै १९६८)

१८९३

प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक
(मृत्यू: २८ जून १९७२)

१८९१

डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक
(मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

१८७१

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक
(मृत्यू: १ जून १९३४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१६

वीणा सहस्रबुद्धे

वीणा सहस्रबुद्धे – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका, आय. आय. टी. (पवई) मध्ये मानवविज्ञानाच्या सहाय्यक प्राध्यापक (२००२-२००४), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (२०१३)
(जन्म: १४ सप्टेंबर १९४८)

(Image Credit: scroll.in)

२०१०

प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: १५ जुलै १९२७)

२००३

कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री
(जन्म: १२ मे १९०७)

२०००

कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार
(जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

१९९३

विष्णुपंत जोग – ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते
(जन्म: १८ सप्टेंबर १९०५)

१९९२

शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते
(जन्म: ? ? ????)

१९८१

दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीचा ‘घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे.
(जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

१९६६

दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
(जन्म: ३१ जुलै १९०७)

१८९५

थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक
(जन्म: ४ मे १८२५)



Pageviews

This page was last modified on 25 September 2021 at 11:42pm