-: दिनविशेष :-

१० नोव्हेंबर

शिवप्रताप दिन

आपल्याला एकच ईस्ट इंडिया कंपनी परिचीत आहे. मात्र सोळाव्या - सतराव्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनी, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेन्च ईस्ट इंडिया कंपनी, स्वीडीश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अशा अनेक कंपन्या भारताबरोबर ’व्यापार’ करण्यासाठी अस्तित्त्वात आल्या होत्या.
       आपला देश बळकावणार्‍या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी फक्त १५ वर्षेच भारतात व्यापाराची परवानगी होती!

महत्त्वाच्या घटना:

२००६

तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या

२००१

ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड

१९९९

शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर

१९९०

भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली. (कार्यकाल: १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१)

१६९८

ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

१६५९

शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. त्यावेळी अफझलखान ‘दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ ...’ असे ओरडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५२

सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका

१९२५

रिचर्ड बर्टन – अभिनेता
(मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)

१९०४

कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
(मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)

१८५१

फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
(मृत्यू: १९ जुलै १८८२)

१८४८

‘राष्ट्रगुरू’ सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते
(मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१९

टी. एन. शेषन

टी. एन. शेषन – भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त (कार्यकाल: १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६), अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
(जन्म: १५ डिसेंबर १९३२)

(Image Credit: Wikipedia)

२००९

सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

१९९६

माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ‘वंदे मातरम’, ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’, ‘गुळाचा गणपती’, ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. ‘वाजई पावा गोविंद’, ‘त्या चित्तचोरट्याला’, ‘अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.
(जन्म: १६ मे १९२६)

१९८२

लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
(जन्म: १९ डिसेंबर १९०६)

१९४१

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक
(जन्म: ३१ जुलै १८७२)

१९३८

मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १९ मे १८८१)

१९२०

दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक
(जन्म: १४ आक्टोबर २००४)

१६५९

अफझल खान – आदिलशहाचा सेनापती
(जन्म: ????)



Pageviews

This page was last modified on 14 December 2021 at 6:36pm