काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या ‘इंडियन एअरलाइन्स फ्लाईट-८१४‘ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
(Image Credit: Wikipedia)
सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
(Image Credit: Wikipedia)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
रेजिनाल्ड फेसेंडेन या कॅनेडियन-अमेरिकन संशोधकाने जगातील पहिले रेडिओ प्रक्षेपण केले. त्यात एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचा समावेश होता.
कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ‘साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
(मृत्यू: ११ जून १९५०)
(Image Credit: आठवणीतली गाणी)
डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
(Image Credit: Wikipedia)
विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ‘उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
(मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक
(मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
(Image Credit: Wikipedia)
भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका, पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (२००१)
(जन्म: ७ सप्टेंबर १९२५)
(Image Credit: Facebook)
मरुथर गोपाल तथा एम. जी. रामचंद्रन – अभिनेते, ए. आय. ए. डी. एम. के. या राजकीय पक्षाचे संस्थापक व तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री, भारतरत्न (१९८८)
(जन्म: १७ जानेवारी १९१७)
(Image Credit: IMDb)
नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
(जन्म: २३ मार्च १८९८)
पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
(जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला.
(जन्म: ?? १४६९)
This page was last modified on 23 December 2021 at 8:31pm