पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
पंडित जवाहरलाल नेहरू यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ‘रॉयल सोसायटी’ची स्थापना
माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक
नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक
(मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: २९ जून २०१०)
चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
(मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
(मृत्यू: २ आक्टोबर १९७५)
मिर्झा राजे जयसिंग
(मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
(जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या
(जन्म: ? ? ????)
जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: ? ? ????)
ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ? ? ????)
जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते
(जन्म: ? ? १९२०)
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ – गायक व अभिनेते
जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ।
रतीचे तया रूप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे।
अशा काव्यमय शब्दांत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी बालगंधर्व यांचे समर्पक वर्णन केले आहे.
(जन्म: २६ जून १८८८)
(Image Credit: Vision of Life)
एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ९ आक्टोबर १८५२)
(Image Credit: The Nobel Prize)
अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.
(जन्म: २९ जानेवारी १८६०)
रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा
(जन्म: १ मे १२१८)
This page was last modified on 08 October 2021 at 3:01pm