एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(Image Credit: The Economic Times)
केन्द्र सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय
भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना ‘बिर्ला अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर’ या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
(Image Credit: ru.wikipedia.org)
दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
‘सेवानंद’ बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळून संस्थेचे नाव ‘पुणे विद्यार्थी गृह’ असे करण्यात आले.
पहिले महायुद्ध – नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
नंदकुमार महादेव नाटेकर ऊर्फ नंदू नाटेकर – १९६१ मध्ये सुरु झालेल्या अर्जुन पुरस्काराचे पहिले विजेते, शैलीदार बॅडमिंटनपटू. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे (१९५६) पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत ५ वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले. भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’. सुरुवातीला टेनिस व बॅडमिंटन या दोन्ही खेळांमध्ये त्यांची कारकीर्द सुरू होती. मात्र, बॅडमिंटनमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर त्यांनी बॅडमिंटनवर अधिक लक्ष केंद्रित केले.
(Image Credit: लोकसत्ता)
विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’
या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.
(मृत्यू: १७ आक्टोबर १९९३)
कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री
(मृत्यू: २९ जून २००३)
आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक
(मृत्यू: १८ जानेवारी १९८३)
इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका
(मृत्यू: २५ एप्रिल २००२)
फ्लॉरेन्स नायटिंगेल – आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १९०७ मधे त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ‘नोटस ऑफ नर्सिंग’ हा
त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)
(Image Credit: विकिपीडिया)
भगवानदास मूळचंद लुथरिया ऊर्फ ‘सुधीर’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायक. आपल्या ४७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बारूद (१९६०), उमर कैद (१९६१), प्रेम पत्र (१९६२), हक़ीकत (१९६४), शहीद (१९६६), दादा (१९६६), महल (१९६९), प्रिन्स (१९६९), प्रेम पुजारी (१९७०), रेशमा और शेरा (१९७१), मेरा गाँव मेरा देश (१९७१), मेहबूब की मेहंदी (१९७१), हरे रामा हरे कृष्णा (१९७१), गॅम्बलर (१९७१), हिरा पन्ना (१९७३), खोटे सिक्के (१९७४), इश्क इश्क इश्क (१९७४), मजबूर (१९७४), धर्मात्मा (१९७५), लैला मजनू (१९७६), अदालत (१९७६), जानेमन (१९७६), ईमान धरम (१९७७), पापी (१९७७), अंजाने में (१९७८), विश्वनाथ (१९७८), देस परदेस (१९७८), बगूला भगत (१९७९), गौतम गोविंदा (१९७९), जोशीला (१९७९), बॉम्बे ४०५ मील (१९८०), दोस्ताना (१९८०), शान (१९८०), कालिया (१९८१), बुलंदी (१९८१), प्रोफेसर प्यारेलाल (१९८१), शराबी (१९८४), शहेनशाह (१९८८), सी. आय. डी. (१९९०), अजूबा (१९९१), शोला और शबनम (१९९२) इ. २०० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. सत्ते पे सत्ता (१९८२) मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. शेवटचा मालुसरा (१९६५) आणि शेजारी शेजारी (१९९०) या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.
(जन्म: ? ? १९४४)
(Image Credit: Bollywood Direct)
तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका
(जन्म: ????)
This page was last modified on 12 May 2021 at 10:52pm