-: दिनविशेष :-

२५ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९४१

संत सखू

‘प्रभात’चा ‘संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

(Image Credit:  @hinduaesthetic)

१९२९

जनरल जेम्स डूलिटिल

जनरल जेम्स हॅरॉल्ड डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

(Image Credit: Pioneers of Flight)

१९१९

रयत शिक्षण संस्था

रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

(Image Credit: Wikipedia)

१९१५

पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू (शॅम्पेन हा फ्रान्समधील एक परगणा आहे. गैरसमज नसावा!)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९

हॅन्सी क्रोनिए

हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान
(मृत्यू: १ जून २००२)

(Image Credit: Cricket Country)

१९४६

बिशन सिंग बेदी
१४ डिसेंबर १९६९

बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज

(Image Credit: CricketMASH)

१९२८

माधव गडकरी

माधव यशवंत गडकरी – पत्रकार, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई सकाळ, गोमंतक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक. १९९२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई चौफेर या वृत्तपत्रात नियमित एक सदर लिहीत असत. पद्मश्री (१९९०)
(मृत्यू: १ जून २००६)

(Image Credit: मैत्री २०१२)

१९२६

बाळ कोल्हटकर

बाळकृष्ण हरी तथा ‘बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
(मृत्यू: ३० जून १९९४)

(Image Credit: Indian Film History)

१९२५

डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर

डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार
(मृत्यू: २० जुलै १९९४)

(Image Credit: मैत्री २०१२)

१९२२

बॅ. नाथ पै
१९९६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

बॅ. पंढरीनाथ बापू तथा नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या लोकसभेतील खासदार (राजापूर), त्यांची लोकसभेतील भाषणे अत्यंत प्रभावी आहेत. मराठी, संस्कृत व इंग्लिश तसेच फ्रेंच व जर्मन भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
(मृत्यू: १७ जानेवारी १९७१ - बेळगाव)

(Image Credit: Wikipedia)

१९२०

प्रा. सतीश धवन

प्रा. सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (१९८१)
(मृत्यू: ३ जानेवारी २००२)

(Image Credit: Wikipedia)

१९१६

पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२०

एस. पी. बालसुब्रम्हण्यम
१९८५ मधील छायाचित्र

दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक, पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) व पद्मविभूषण (२०२१ - मरणोत्तर) पुरस्कार विजेते श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांचे Covid-19 मुळे निधन
(जन्म: ४ जून १९४६)

(Image Credit: Wikipedia)

२०१३

शं. ना. नवरे

शंकर नारायण तथा शं. ना. नवरे – लेखक, नाटककार व पटकथाकार. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. ‘शन्नाडे’ या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्षं, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस, निवडक, पैठणी, असे त्यांचे एकूण २७ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ या कादंबरीवरून लिहिलेले ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक अतिशय गाजले आहे.
(जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

(Image Credit: लोकसत्ता)

२००४

अरुण कोलटकर

अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी, साहित्य अकादमी पुरस्कार (२००५) विजेते
(जन्म: १ नोव्हेंबर १९३२)

(Image Credit: Wikipedia)

१९९८

कमलाकर सारंग

कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक
(जन्म: २९ जून १९३४)Pageviews

This page was last modified on 25 September 2021 at 11:33pm