-: दिनविशेष :-

१८ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००९

गायडींग लाईट

सलग ७२ वर्षे (टेलिव्हिजनवर ५७ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर १५ वर्षे) सुरु असलेल्या ‘गायडींग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. १९३७ ते १९५६ अशी १९ वर्षे या मालिकेचे रेडिओ आणि टेलिव्हिजन अशा दोन्ही ठिकाणी प्रसारण होत होते.

(Image Credit: विकिपीडिया)

२००२

चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

१९९७

महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.

१९६२

बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९४८

निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ‘ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.

१९४७

अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

१९२७

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना

१९२४

गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९१९

हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

१८८५

कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

१८१०

चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१५०२

आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१५

मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खूष होऊन त्यांना ‘नूतन पेंढारकर’ हे नाव प्रदान केले.
सह्याद्री वाहिनीवरील ‘मुखवटे आणि चेहरे’ या कार्यक्रमातील अनंत दामले यांची मुलाखत पहा (५१:४६):


(मृत्यू: ९ ऑक्टोबर १९९९)

१९१२

गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

१९०६

प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ‘संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे.
(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ - हाथरस, उत्तर प्रदेश)

१९०५

ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री
(मृत्यू: १५ एप्रिल १९९०)

१९०५

विष्णुपंत जोग – ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते
(मृत्यू: २९ जून १९९३)

१९००

शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
(मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

१७०९

सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत
(मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

५३

ट्राजान – रोमन सम्राट
(मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक
(जन्म: १३ मे १९२५)

२००२

शिवाजी सावंत

शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ‘मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे.
(जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

(Image Credit: Library Mantra)

१९९९

अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

१९९५

प्रभूलाल गर्ग ऊर्फ ‘काका हाथरसी’ – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘मेरा जीवन ए वन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले ‘संगीत’ हे मासिक सुरू केले, ते आजतागायत चालू आहे.
(जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९२

मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
(जन्म: १७ डिसेंबर १९०५ - लखनौ, उत्तर  प्रदेश)

१७८३

लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ
(जन्म: १५ एप्रिल १७०७)Pageviews

This page was last modified on 08 October 2021 at 10:38pm