-: दिनविशेष :-

१९ जुलै


महत्त्वाच्या घटना:

१९९६

अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९९३

ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

१९९२

ऊर्दू शायर मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर

१९८०

सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९७६

नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

१९६९

भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९६९

नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

१९५२

फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९४७

म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान व त्यांच्या ६ मंत्री आणि २ सहकार्‍यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

१९४०

दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई

१९३५

जगात ‘पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू

१९४६

इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू

१९३८

डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला. पद्मभूषण (१९६५), पद्मविभूषण (२००४), फाय फौंडेशनचा राष्ट्रभुषण पुरस्कार (१९८१), महाराष्ट्र भूषण (२०१०), फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे प्रिक्स ज्यूल जान्सेन पारितोषिक, इन्फोसिस पारितोषिक (२००९), भटनागर पारितोषिक, एम. पी. बिर्ला पारितोषिक, साहित्य अकादमी अवॉर्ड (२०१४) इत्यादि पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक येथे २०२१ मध्ये झालेल्या ९४ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१९०२

यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

१८९६

ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक
(मृत्यू: ६ जानेवारी १९८१)

१८२७

मंगल पांडे – क्रांतिकारक
(मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१७

भिलारे गुरुजी – १९४४ मध्ये नथुराम गोडसे याने पाचगणी येथे गांधीजींवर जंबियाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या हल्ल्यातून भिलारे गुरुजींनी गांधीजींना वाचवले.
(जन्म: ? ? ????)

१९६८

प्रतापसिंह गायकवाड – बडोद्याचे महाराज
(जन्म: २९ जून १९०८)

१९६५

सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २६ मार्च १८७५)

१८८२

फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
(जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

९३१

उडा – जपानचा सम्राट
(जन्म: ५ मे ८६७)



Pageviews

This page was last modified on 26 August 2021 at 11:56pm