-: दिनविशेष :-

१ जून

आंतरराष्ट्रीय बाल दिन

दुर्ग दिन


महत्त्वाच्या घटना:

२००४

रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: १ जून २००४ ते ३१ ऑक्टोबर २००५)

२००३

थ्री गॉर्जेस धरण
पॅनोरमा

चीनमधील यांगत्से नदीवरच्या महाप्रचंड अशा ‘थ्री गॉर्जेस’ धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. १४ डिसेंबर १९९४ रोजी या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली होती आणि डिसेंबर २०१५ मध्ये ते बांधून पूर्ण झाले.

(Image Credit: Wikipedia)

२००१

नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.

१९९६

भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून हरदनहळ्ळी दोड्डेगौडा तथा एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
(कार्यकाल: १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७)

१९६१

अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

१९५९

द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

१९३०

दख्खनची राणी

मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

(Image Credit: Deccan Herald)

ही भारतातील पहिली ‘सुपर फास्ट’ गाडी आहे. ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे‘ या कंपनीची ही गाडी सुरुवातीला कल्याण-पुणे-कल्याण अशी धावत असे.

दख्खनची राणी

(Image Credit:  Mumbai Heritage)

१९२९

प्रभात फिल्म कंपनी

विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. १३ ऑक्टोबर १९५३ रोजी ही कंपनी विसर्जित करण्यात आली.

(Image Credit: विकिपीडिया)

१८३१

सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.

१७९६

टेनेसी अमेरिकेचे १६ वे राज्य बनले.

१७९२

केंटुकी अमेरिकेचे १५ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

आर. माधवन
२०१६ मधील छायाचित्र

रंगनाथन माधवन तथा आर. माधवन – तामिळ आणि हिंदी चित्रपटातील अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता

(Image Credit: Wikipedia)

१९६५

नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू

१९३८

लीला माणिकचंद गांधी – नर्तिका व अभिनेत्री. ७५ चित्रपटात व २५ नाटकांत त्यांनी काम केलं. ‘महाकवी कालिदास’ या संस्कृत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. ‘कथा अकलेच्या कांद्याची’मधील त्यांची नृत्यं पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना सांगून ‘आशीर्वाद’ या हिंदी चित्रपटातील ‘सवाल जवाब’साठी त्यांना बोलवलं. यातील लीलाबाईंचं नृत्य गाजलं.

१९३०

बाबासाहेब पांडुरंग तथा बाबा आढाव – सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते

१९२९

नर्गिस
लाजवंती (१९५८)

फातिमा रशिद ऊर्फ ‘नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: ३ मे १९८१)

(Image Credit: विकिपीडिया)

१९२६

पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक
(मृत्यू: २१ सप्टेंबर १९९९)

१९२६

मेरिलीन मन्‍रो

नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्‍रो – अमेरिकन अभिनेत्री
(मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)

(Image Credit: Pexels)

१८७२

नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ‘कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...’ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)

१८४२

सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
(मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६

माधव गडकरी

माधव यशवंत गडकरी – पत्रकार, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई सकाळ, गोमंतक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक. १९९२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई चौफेर या वृत्तपत्रात नियमित एक सदर लिहीत असत. पद्मश्री (१९९०)
(२५ सप्टेंबर १९२८)

(Image Credit: मैत्री २०१२)

२००२

हॅन्सी क्रोनिए

दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन
(जन्म: २५ सप्टेंबर १९६९)

(Image Credit: Cricket Country)

२००१

नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या
(जन्म: २८ डिसेंबर १९४५)

२०००

मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार. यांनी एकपात्री प्रयोगांची नवी शैली निर्माण केली. प्रसंग लहान, विनोद महान (१५०० हून अधिक प्रयोग), हसायदान (१००० हून अधिक प्रयोग), ‘जिंदादिल’ मराठी शेरोशायरी (५०० हून अधिक प्रयोग), ‘ह्युमर फ्रॉम प्रोफेशन’ (३०० हून अधिक प्रयोग) असे अक्षरश: हजारो एकपात्री प्रयोग त्यांनी केले.
(जन्म: ? ? १९३३)

१९९८

गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ‘गडसम्राट’. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले.
(जन्म: ८ जुलै १९१६)

१९९६

नीलम संजीव रेड्डी
अधिकृत छायाचित्र (१९७७)

नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती (कार्यकाल: २५ जुलै १९७७ ते २४ जुलै १९८२), लोकसभेचे ४ थे सभापती (कार्यकाल: १७ मार्च १९६७ ते १७ जुलै १९६९ आणि २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७), केंद्रीय मंत्री व (अविभाजित) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (कार्यकाल: १ नोव्हेंबर १९५६ ते ११ जानेवारी १९६० आणि १२ मार्च १९६२ ते २० फेब्रुवारी १९६४), स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते
(जन्म: १९ मे १९१३ - इलुरू, तामिळनाडू)

(Image Credit: Wikipedia)

नीलम संजीव रेड्डी यांचा अल्पपरिचय करून देणारा व्हिडीओ (०३:५२):

१९८७

ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार
(जन्म: ७ जून १९१४)

१९८४

नाना पळशीकर – अभिनेते
(जन्म: २० मे १९०८)

१९६८

हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका
(जन्म: २७ जून १८८०)

१९४४

महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली.
(जन्म: १८ मार्च १८६७)

१९३४

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक
(जन्म: २९ जून १८७१)

१८६८

जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २३ एप्रिल १७९१)Pageviews

This page was last modified on 24 September 2021 at 3:30pm