टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
मुंबई गोदीत उभ्या असलेल्या ‘फोर्ट स्टायकिन’ या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की १,४०० किमी दूर असलेल्या सिमला येथील वेधशाळेत (त्याकाळच्या उपकरणांनी देखील) त्याची नोंद झाली. या घटनेत लागलेल्या आगी विझवताना अग्निशामक दलाचे ४६ जवान मृत्युमुखी पडले. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस ‘राष्ट्रीय अग्निशामक दल दिन’ म्हणून पाळला जातो.
आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
चिमाजीअप्पाने अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
[वैशाख व. ५ शके १६५८]
सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
रामदास फुटाणे – वात्रटिकाकार
मार्गारेट अल्वा – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल
दत्ताराम मारुती तथा द. मा. मिरासदार – विनोदी लेखक, कथाकथनकार, त्यांनी कथाकथनाचे सुमारे ३,००० हुन अधिक प्रयोग केले. साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार इत्यादी. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. पुणे येथे झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप
(मृत्यू: १८ जून २००९ - सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)
शमशाद बेगम – पार्श्वगायिका
(मृत्यू: २३ एप्रिल २०१३)
शांता हुबळीकर – अभिनेत्री
(मृत्यू: १७ जुलै १९९२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. भारतरत्न (१९९०)
(मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)
क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध
(मृत्यू: ८ जुलै १६९५)
राम प्रसाद गोएंका – उद्योगपती
(जन्म: १ मार्च १९३०)
चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते
(जन्म: ? ? ????)
केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन – इतिहासकार
(जन्म: ९ एप्रिल १८९३)
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय अभियंता दिन म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतरत्न (१९५५)
(जन्म: १५ सप्टेंबर १८६०)
(Image Credit: Wikipedia)
भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. [चैत्र व. १२ शके १७८३]
(जन्म: ३० डिसेंबर १८७९)
This page was last modified on 14 October 2021 at 12:30am