-: दिनविशेष :-

१६ आक्टोबर

जागतिक अन्न दिन

World Food Day

माणसाला चवीचे ज्ञान होते ते जिभेवर असलेल्या चवकलिकांमुळे. चर्वण करणार्‍या प्राण्यांमध्ये चवकलिकांची संख्या जास्त असते. माणसात चवकलिकांची संख्या सुमारे तीन ते दहा हजार इतकी असते. डुकरांमध्ये ती असते साडेपाच हजार, गायींमध्ये पस्तीस हजार तर हरणांमध्ये असते तब्बल पन्नास हजार!
         चर्वण न करणार्‍या प्राण्यांमध्ये मात्र चवकलिकांची संख्या अगदी कमी असते. पक्ष्यांमध्ये चवकलिकांची संख्या पन्नास ते पाचशे एवढीच असते.

महत्त्वाच्या घटना:

१९९९

गीत सेठी

जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ‘फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

(Image Credit: Mumbai Mirror)

१९८४

आर्चबिशप डेसमंड टुटू

आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(Image Credit: Mail Online)

१९७५

रहिमा बानू बेगम

बांगला देशातील रहिमा बानू बेगम ही ३ वर्षाची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली. १६ ऑक्टोबर १९७२ मध्ये जन्मलेल्या या मुलीला देवी झाल्याचे १६ ऑक्टोबर १९७५ रोजी लक्षात आले.

(Image Credit: Wikipedia)

१९७३

हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्‍री किसिंजर आणि व्हिएतनामचे नेते ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र ली डक थो यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

(Image Credit: Britannica)

१९६८

हर गोविंद खुराना

हर गोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (संयुक्त) प्रदान

(Image Credit: Wikipedia)

१९५१

लियाकत अली खान
१९४५ मधील छायाचित्र

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

(Image Credit: Wikipedia)

१९२३

द वॉल्ट डिस्‍ने कंपनी
द वॉल्ट डिस्‍ने कंपनी

वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ‘द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.

(Image Credit: The Walt Disney Company)

१९०५

लॉर्ड कर्झन

भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

(Image Credit: Wikipedia)

१८६८

डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

१८४६

डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१७९३

फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ‘गिलोटीन’वर वध करण्यात आला.

१७७५

ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

२००३

कृत्तिका – नेपाळची राजकन्या

१९५९

अजय सरपोतदार

अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
(मृत्यू: ३ जून २०१०)

(Image Credit: Times Content)

१९४८

हेमा मालिनी

‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी चक्रवर्ती अय्यंगार ऊर्फ आयेशा बी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक, राज्यसभा सदस्य (२००३ ते २००९), लोकसभा खासदार (मथुरा), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) कार्याध्यक्षा (2006). ‘इधु साथियाम’ (१९६३) या तामिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सपनोंका सौदागर (१९६८) हा मोठी भूमिका असलेला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. त्यानंतर जॉनी मेरा नाम, अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले, सीता और गीता अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. १९८० च्या दशकातील त्या सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत.

(Image Credit: Old Indian Photos)

१९०७

सोपानदेव चौधरी

सोपानदेव चौधरी – कवी. ‘काव्यकेतकी’, ‘अनुपमा’, ‘सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
(मृत्यू: ४ आक्टोबर १९८२)

१८९६

सेठ गोविंद दास

सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या लोकसभेतील खासदार (जबलपूर), पद्मभूषण (१९६१)
(मृत्यू: १८ जून १९७४)

(Image Credit: Hindi Jeevan Parichay)

१८९०

समतानंद

अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ‘मौज’ आणि ‘निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला.
(मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

१८५४

ऑस्कर वाईल्ड

ऑस्कर वाईल्ड – आयरिश कवी व नाटककार, ‘कलेसाठी कला’ या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत ‘दूरचे दिवे’ हे नाटक ‘अ‍ॅन आयडियल हजबंड’चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य ‘द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ या नावाने संकलित झाले आहे.
(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

(Image Credit: Britannica)

१८४१

इटो हिरोबुमी
१९०९ मधील छायाचित्र

इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: २६ आक्टोबर १९०९)

(Image Credit: Wikipedia)

१६७०

बंदा सिंग बहादूर

बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती
(मृत्यू: ९ जून १७१६)

(Image Credit: Dharmayudh)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

नागनाथ संतराम तथा ‘ना. सं.’ इनामदार – लेखक. शहेनशहा, राऊ, झुंज, राजेश्री, शिकस्त, मंत्रावेगळा, झेप इ. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या खूप गाजल्या आहेत.
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३)

१९९७

दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक (Cinematographer)
(मृत्यू: ? ? ????)

१९८१

मोशे दायान

मोशे दायान – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख आणि मुत्सद्दी
(जन्म: २० मे १९१५)

(Image Credit: FOZ Museum)

१९५१

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या समवेत लियाकत अली खान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या समवेत

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या
(जन्म: १ आक्टोबर १८९५ - उत्तर प्रदेश, भारत)

(Image Credit: Wikipedia)

१९४८

माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ‘म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते.
(जन्म: ? ? १८८५)

१९४४

गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, ‘प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक
(जन्म: ? ? १८८७)

१९०५

पंत महाराज बाळेकुन्द्री

दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी तथा पंत महाराज बाळेकुन्द्री – अवधूत नवनाथ संप्रदायाचे आध्यात्मिक गुरू
(जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

(Image Credit: Wikipedia)

१७९३

मेरी आंत्वानेत
१७७८ मधील प्रतिमाचित्र

मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी
(जन्म: २ नोव्हेंबर १७५५)

(Image Credit: Wikipedia)Pageviews

This page was last modified on 15 October 2021 at 11:24pm