-: दिनविशेष :-

९ जून


महत्त्वाच्या घटना:

२००६

१८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

२००१

भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

१९७५

ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

१९७४

सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

१९६४

भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.
(कार्यकाल: ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६)

१९४६

राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

१९३१

रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

१९२३

बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

१९०६

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण

१७००

सज्जनगड

दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

(Image Credit: Bharat Estates)

१६९६

छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले.

६८

रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८५

सोनम कपूर

सोनम कपूर – अभिनेत्री

(Image Credit:  Sonam K Ahuja)

१९७७

अमिशा पटेल

अमिशा पटेल – अभिनेत्री

(Image Credit: MUBI)

१९४९

किरण बेदी

किरण बेदी – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी?, पुडुचेरीच्या नायब राज्यपाल, भाजप नेत्या

(Image Credit: Political Keeda)

१९२०

मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते
(मृत्यू: २६ एप्रिल १९९९)

१९१२

वसंत देसाई – संगीतकार
(मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

१६७२

पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक
(जन्म: १७ सप्टेंबर १९१५)

१९९५

प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ‘एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी
(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

१९९३

सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, बरजात्री [१९५१ - बंगाली], जागृती [१९५४],चलती का नाम गाडी [१९५८], दोस्ती [१९६४], मेरे लाल [१९६६], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
(जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९१

राज खोसला
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

राज खोसला – १९५० ते १९८० या कालखंडातील आघाडीचे दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्माते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन पार्श्वगायक बनण्याच्या हेतूने ते पंजाबातून मुंबईत आले होते. परंतु देव आनंदच्या सांगण्यावरून ते दिग्दर्शनाकडे वळले आणि गुरु दत्तचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सी. आय. डी. (१९५६), सोलवां साल (१९५८), बम्बई का बाबू (१९६०), एक मुसाफिर एक हसीना (१९६२), वह कौन थी? (१९६४), दो बदन (१९६६), दो रास्ते (१९६९), चिराग (१९६९), मेरा गाँव मेरा देश (१९७१), प्रेम कहानी (१९७५), नेहले पे दहला (१९७६), मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट होत. अभिनेत्रींमधील कलागुण उत्कृष्टपणे सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणून त्यांना Women's Director असे म्हणत. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘neo-noir’ प्रवाहाची सुरुवात त्यांनी केली असे म्हणता येईल.
(जन्म: ३१ मे १९२५)

(Image Credit: Wikipedia)

१९८८

गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ‘विवेक’ – मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते
(जन्म: २३ फेब्रुवारी १९१८)

१९४६

आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा

(जन्म: २० सप्टेंबर १९२५)

१९००

आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू
(जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)

१८७०

चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक
(जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

१८३४

पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक
(जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

१७१६

बंदा सिंग बहादूर
खांदा, सोनिपत येथील स्मारक

बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती
(जन्म: १६ आक्टोबर १६७०)

(Image Credit: Dharmayudh)

६८

नीरो – रोमन सम्राट
(जन्म: १५ डिसेंबर ३७)



Pageviews

This page was last modified on 15 October 2021 at 8:58pm