प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा ‘कबीर सन्मान’ मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर. साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्यांना हा सन्मान देण्यात येतो.
नेल्सन मंडेला यांना ‘लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’
दुसर्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्या अॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
‘संगीत नाटक अकादमी’ची स्थापना
दुसरे महायुद्ध - जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे – नाट्यसमीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. वि.भा. देशपांडे यांची इ.स. २०१५ सालापर्यंत जवळपास ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पैकी नाट्यविषयक लेखनाची एकूण २५ पुस्तके आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे: प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
(मृत्यू: ९ मार्च २०१७)
(Image Credit: नवा काळ)
क्लिंट इस्टवूड – अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक
(Image Credit: Sergio Leone, Public domain, via Wikimedia Commons)
पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: ४ फेब्रुवारी २००१)
वनराज भाटिया – प्रतिथयश संगीतकार. चित्रपट, रंगभूमी, जाहिराती तसेच दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतील संगीत समर्थपणे हाताळणारे कुशल संगीतकार, त्यांनी ७००० हुन अधिक जिंगल्सना संगीत दिले आहे (Liril, Dulux). अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पार्श्वसंगीत व शीर्षकगीत त्यांच्या नावावर आहे. शाम बेनेगल यांच्या अंकुर, भूमिका, सरदारी बेगम असे १६ चित्रपट व तमस ही मालिका यांचे संगीत किंवा पार्श्वसंगीत त्यांचे आहे.
(मृत्यू: ७ मे २०२१)
(Image Credit: Scroll.in)
राज खोसला – १९५० ते १९८० या कालखंडातील आघाडीचे दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्माते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन पार्श्वगायक बनण्याच्या हेतूने ते पंजाबातून मुंबईत आले होते. परंतु देव आनंदच्या सांगण्यावरून ते दिग्दर्शनाकडे वळले आणि गुरु दत्तचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सी. आय. डी. (१९५६), सोलवां साल (१९५८), बम्बई का बाबू (१९६०), एक मुसाफिर एक हसीना (१९६२), वह कौन थी? (१९६४), दो बदन (१९६६), दो रास्ते (१९६९), चिराग (१९६९), मेरा गाँव मेरा देश (१९७१), प्रेम कहानी (१९७५), नेहले पे दहला (१९७६), मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट होत. अभिनेत्रींमधील कलागुण उत्कृष्टपणे सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणून त्यांना Women's Director असे म्हणत. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘neo-noir’ प्रवाहाची सुरुवात त्यांनी केली असे म्हणता येईल.
(मृत्यू: ९ जून १९९१)
(Image Credit: Wikipedia)
भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ‘फास्टर फेणे’ आणि ‘बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक
(मृत्यू: २७ आक्टोबर २००१ - पुणे)
(Image Credit: Bytes of India)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – माळवा साम्राज्याच्या महाराणी, आपल्या साम्राज्यात त्यांनी औद्योगिकरणाला चालना दिली तसेच देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार केला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५ - इंदौर, मध्य प्रदेश)
(Image Credit: बाळकृष्ण पांचाळ कलामंदिर)
अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
(जन्म: ७ जुलै १९१४)
सुभाष गुप्ते – लेग स्पिनर
(जन्म: ११ डिसेंबर १९२९)
पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता
ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
(जन्म: २० जुलै १९२१ - वाराणसी)
दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. ‘किशोरीचे हृदय’, ‘विद्या आणि वारुणी’ ही कादंबरी, ‘तोड ही माळ’ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले.
(जन्म: १९ आक्टोबर १९०२ - गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर
(जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)
डॉ. रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, प्राचीनवस्तू संग्राहक, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी, मुंबईचे नगरपाल (१८६९ आणि १८७१). प्राचीन नाण्यांचा त्यांचा संग्रह बराच मोठा होता. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून १९७५ मध्ये ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’चे नामकरण ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ असे करण्यात आले.
(जन्म: ७ सप्टेंबर १८२२
- मांद्रें, पेडणें, गोवा)
(Image Credit: भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय)
रोमन सम्राट पेट्रोनिअस मॅक्झिमस (कार्यकाल: १७ मार्च ४५५ ते ३१ मे ४५५) याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले
(जन्म: ? ? ३९६)
This page was last modified on 26 October 2021 at 9:39pm