-: दिनविशेष :-

७ फेब्रुवारी

ग्रेनाडाचा स्वातंत्र्यदिन


महत्त्वाच्या घटना:

२००३

सचिन तेंडुलकरचे गुरु व क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९९९

युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी

१९७४

ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९७१

स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९६५

मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९४८

कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९२०

बाबूराव पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ‘सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या ‘आर्यन’ सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९१५

गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता ‘हिर्‍याची अंगठी’.

१८५६

ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८

एस. रामचंद्रन पिल्ले

एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते, राज्यसभा सदस्य (१९९१, १९९७), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो मेम्बर

(Image Credit: Janam TV)

१९३४

सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता
(मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

१९३१

सत्येन कप्पू

सत्येंद्र शर्मा तथा सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता
(मृत्यू: २७ ऑक्टोबर २००७ - मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१८१२

चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक

(मृत्यू: ९ जून १८७०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे
(जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

१९९०

वामनराव देशपांडे

वामनराव हरी देशपांडे – संगीत समीक्षक
(जन्म: २७ सप्टेंबर १९०७)

१९३८

हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक
(जन्म: २० डिसेंबर १८६८)

१२७४

श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक
(जन्म: ४ सप्टेंबर १२२१)Pageviews

This page was last modified on 26 October 2021 at 9:32pm