-: दिनविशेष :-

८ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

२०००

छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

१९७१

NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९६०

पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ‘हिंदकेसरी’ बनले.

१९४२

दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९३६

१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.

१९३१

महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.

१८९९

रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१७१४

छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६३

मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू

१९४१

जगजीतसिंग
भुवनेश्वर मधील कार्यक्रम (२०११)

जगजीतसिंग – गझलगायक
(मृत्यू: १० आक्टोबर २०११)

(Image Credit: Wikipedia)

१९२५

शोभा गुर्टू

भानुमती शिरोडकर तथा शोभा गुर्टू – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, ठुमरी गायनासाठी त्या विख्यात होत्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मभूषण (२००२)
(मृत्यू: २७ सप्टेंबर २००४ - मुंबई)

(Image Credit: Rekhta)

१९०९

प्रा. केशव विष्णू तथा ‘बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
(३ जानेवारी १९९८)

१८९७

डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आले होते. ‘जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली.
(मृत्यू: ३ मे १९६९)

१८४४

गोविंद  शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार. व्युत्पत्तिप्रदीप हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ? ? ????)

१८३४

दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८२८

ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक
(मृत्यू: २४ मार्च १९०५)

१७००

डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ
(मृत्यू: १७ मार्च १७८२)

१६७७

जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
(जन्म: १४ मे १९२६)

१९९५

भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अ‍ॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते.
(जन्म: ? मार्च १९१३)

१९९४

गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार
(जन्म: ? ? १९११)

१९९४

यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक
(जन्म: १९ जुलै १९०२)

१९७५

सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

१९७१

डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक
(जन्म: ३० डिसेंबर १८८७)

१९२७

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

‘गायनाचार्य’ बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतातील ‘भीष्माचार्य’, त्यांनी ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे त्यांचे शिष्य आहेत.
(जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

(Image Credit: लोकसत्ता)

१७२५

पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार
(जन्म: ९ जून १६७२)Pageviews

This page was last modified on 09 October 2021 at 11:28pm