१८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशवे (धोंडू पंत) नेपाळमधे निघून गेले व तेथे वर्षभरातच त्यांचे निधन झाले. मात्र इंग्रजांनी त्यांची एवढी धास्ती घेतली होती,की नानासाहेब पेशवे असल्याच्या संशयावरुन अनेकांना अटक करण्याचे सत्र देशात ठिकठिकाणी १९१७ पर्यंत सुरू होते.
अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).
बॅटल ऑफ सेक्सेस ह्यूस्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.
(६-४, ६-३, ६-३)
(Image Credit: The Guardian)
वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१८५७ चा राष्ट्रीय उठाव ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा
(मृत्यू: ९ जून १९४६)
दत्तात्रेय नरसिंह गोखले – चरित्र चिंतक, चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.
(मृत्यू: २७ जून २०००)
(Image Credit: महाराष्ट्र नायक)
नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ८ जानेवारी १९७३)
(Image Credit: @Drswapniltorne)
चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा
(मृत्यू: २३ आक्टोबर १९१०)
कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते व चित्रकार
(मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
अॅनी वुड तथा अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ‘होमरुल लीग’ची स्थापना केली.
(जन्म: १ आक्टोबर १८४७)
(Image Credit: Wikipedia)
गुलाब गोंडोजी मोहोड तथा संत गुलाबराव महाराज – स्वतः अंध असूनही अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात हजारो लोकांना मार्ग दाखवण्याचे कार्य गुलाबरावमहाराजांनी केले. त्यांनी विविध विषयांवर १३९ पुस्तके लिहिली तर सुमारे २५,००० कडव्यांची काव्यरचना केली. गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला.
(जन्म: ६ जुलै १८८१)
(Image Credit: Wikipedia)
This page was last modified on 20 September 2021 at 12:48pm