-: दिनविशेष :-

३ एप्रिल


महत्त्वाच्या घटना:

२०००

आय. एन. एस. आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

१९७५

बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

१९७३

मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ. जोएल अँगेल याला केला.

१९४८

ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५

नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका
(मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

१९६२

जयाप्रदा – चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य

१९५५

हरिहरन – गायक

१९३४

जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ

१९३०

हेल्मुट कोल्ह – जर्मन चॅन्सेलर (१९८२ - १९८८)
(मृत्यू: १६ जून २०१७)

१९१४

सॅम माणेकशा
१९७० मध्ये जनरलच्या गणवेशात

फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी जमशेदजी फ्रामजी उर्फ ‘सॅम बहादूर’ माणेकशा – स्वतंत्र भारताचे ७ लष्कर प्रमुख (८ गोरखा रायफल्स), पद्मविभूषण (१९७२), पद्मभूषण (१९६८), मिलिटरी क्रॉस (१९४२)

(मृत्यू: २७ जून २००८ - वेलिंग्टन, तामिळनाडू)

(Image Credit: Wikipedia)

१९०४

रामनाथ गोएंका – ‘इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
(मृत्यू: ५ आक्टोबर १९९१)

१९०३

कमलादेवी चट्टोपाध्याय

कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या
(मृत्यू: २९ आक्टोबर १९८८)

(Image Credit: Wikipedia)

१८८२

द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ‘नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ‘वीरधवल’, ‘रायक्लब अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते.
(मृत्यू: २१ जून १९२८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१७

किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका
(जन्म: १० एप्रिल १९३२)

१९९८

हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ‘चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक
(जन्म: ? ? ????)

१९९८

मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ
(जन्म: १७ डिसेंबर १९००)

१९८५

डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
(जन्म: १३ मार्च १८९३)

१८९१

एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती
(जन्म: ४ एप्रिल १८४२)

१६८०

छत्रपती शिवाजी राजे भोसले
(जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)



Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 10:02pm