-: दिनविशेष :-

२९ मे

जागितक पचनस्वास्थ्य दिन

World Digestive Health Day


महत्त्वाच्या घटना:

१९५३

माऊंट एव्हरेस्ट
नेपाळमधील ‘काला पत्थर’ या टेकडीवरून घेतलेले छायाचित्र

एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट (सागरमाथा) हे जगातील सर्वोच्‍च शिखर (उंची: ८८४८.८६ मीटर) सर केले.

(Image Credit: Wikipedia)

१९१४

एम्प्रेस ऑफ आयर्लंड
एम्प्रेस ऑफ आयर्लंड

कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाशी ‘एम्प्रेस ऑफ आयर्लंड’ या आलिशान जहाजाची स्टोरस्टाड या कोळसावाहू जहाजाशी टक्कर होऊन जहाजावरील १४७७ पैकी १०१२ जणांना जलसमाधी मिळाली. वास्तविक पाहता १९१२ साली झालेल्या टायटॅनिक दुर्घटनेनंतर लागू झालेल्या नियमानुसार या जहातात पुरेशा जीवरक्षक होड्या होत्या. परंतु धडक झाल्यावर १४ मिनिटातच जहाज बुडाले त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.

(Image Credit: Wikipedia)

१८४८

विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.

१७२७

पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२९

पीटर हिग्ज – भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते (२०१३) ब्रिटिश शास्त्रज्ञ

१९१७

जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१९१४

शेर्पा तेनसिंग नोर्गे – एव्हरेस्टवीर
(मृत्यू: ९ मे १९८६)

१९०५

हिराबाई बडोदेकर

‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि ताराबाई माने यांची कन्या. ख्याल, ठुमरी, गज़ल आणि भजन गायिका. ‘पुण्यप्रभाव’, ‘सौभद्र’, ‘विद्याहरण’, ‘युगांतर’ आदी नाटकांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. १९७० मधे त्यांना ‘विष्णूदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री लाल किल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात ‘वंदे मातरम’ हे (त्यावेळचे) राष्ट्रगीत गाण्याचा मान त्यांना मिळाला.
(मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)

(Image Credit: sarangi.info)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’, ‘लोकमान्य टिळक’, ‘हाजी पीर’, ‘सोनार बांगला’, ‘भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(जन्म: २६ ऑगस्ट १९२२)

२००७

स्‍नेहल भाटकर – संगीतकार
(जन्म: १७ जुलै १९१९)

१९८७

चौधरी चरणसिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ‘लोकदल’ पक्षाचे संस्थापक
(जन्म: २३ डिसेंबर १९०२)

१९७७

सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक
(जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)

१९७२

पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)

१८९२

बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक
(जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ - तेहरान, इराण)

१८२९

सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १७ डिसेंबर १७७८)Pageviews

This page was last modified on 29 May 2021 at 7:25pm