-: दिनविशेष :-

३ डिसेंबर

जागतिक विकलांग दिन


महत्त्वाच्या घटना:

१९८४

भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ‘युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९७९

आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९७१

पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९६७

डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१८७०

‘बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१८२९

लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८१८

इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१७९६

दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९२

माधव केशव काटदरे – निसर्गकवी
(मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

१८८९

खुदिराम बोस – क्रांतिकारक
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

१८८४

डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

१८८२

जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
(मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

१७७६

श्रीमंत यशवंतराव होळकर

हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
(मृत्यू: २८ आक्टोबर १८११ - भानपुरा, मध्य प्रदेश)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

देव आनंद
कश्ती (१९५४) या चित्रपटात

धरमदेव पिशोरीमल आनंद तथा देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता, पद्मभूषण (२००१), दादासाहेब फाळके पुरस्कार (२००२)
(जन्म: २६ सप्टेंबर १९२३)

१९७९

मेजर ध्यानचंद
१९८० मध्ये जारी करण्यात आलेले टपाल तिकीट

मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू
(जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

(Image Credit: Wikipedia)

१९५१

बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत.
(जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

१८९४

आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
(जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

१५५२

सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ‘ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे.
(जन्म: ७ एप्रिल १५०६ - झेविअर, स्पेन)Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 12:51pm