-: दिनविशेष :-

२८ ऑक्टोबर


महत्त्वाच्या घटना:

१९६९

तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र
Unit III

तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

(Image Credit: Wikipedia)

१९४०

दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

१९२२

बेनिटो मुसोलिनी

बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

(Image Credit: Wikipedia)

१९०४

पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१८८६

Statue of Liberty

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

(Image Credit: National Park Service, USA)

१६३६

हारवर्ड विद्यापीठ

अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना

(Image Credit: College Consensus)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६७

ज्यूलिया रॉबर्टस

ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री

(Image Credit: COSMOPOLITAN)

१९५८

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री

(Image Credit:  @INCashokchavan)

१९५६

मोहम्मद अहमदिनेजाद

मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: ३ ऑगस्ट २००५ ते ३ ऑगस्ट २०१३)

(Image Credit: Wikipedia)

१९५५

बिल गेटस

विल्यम हेन्री गेट्स (तिसरा) तथा बिल गेटसमायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक

(Image Credit: The Wall Street Journal)

१९५५

इन्द्रा नूयी

इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी

(Image Credit: Forbes)

१९३०

अंजान

लालजी पाण्डेय तथा ‘अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांसाठी १५०० हुन अधिक गाणी लिहिली. त्यामध्ये बहारें फिर भी आयेगी (१९६६), कब? क्यूँ? और कहाँ? (१९७०), राजा काका (१९७५), अपने रंग हजार (१९७५), खान दोस्त (१९७६), दो अंजाने (१९७६), खून पसीना (१९७७), पापी (१९७७), कसम खून की (१९७७), विश्वनाथ (१९७८), गंगा की सौगंध (१९७८), बदलते रिश्ते (१९७८), डॉन (१९७८), मुकद्दर का सिकंदर (१९७८), मुकद्दर (१९७८), दो और दो पाँच (१९८०), लावारिस (१९८१), याराना (१९८१), नमक हलाल (१९८२), महान (१९८३), बंधन कच्चे धागोंका (१९८३), शराबी (१९८४) इत्यादी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मात्र डॉन चित्रपटातले ‘खाईके पान बनारसवाला ...’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल.
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७ - मुंबई)

(Image Credit: https://en.wikipedia.org/wiki/Anjaan_(lyricist))

१८९३

कवी गिरीश

शंकर केशव कानेटकर ऊर्फ ‘कवी गिरीश’
(मृत्यू: ४ डिसेंबर १९७३ - पुणे)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१८६७

भगिनी निवेदिता
१९६८ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता’ ठेवले.
(मृत्यू: १३ आक्टोबर १९११ - दार्जिलिंग, पश्चिम बंगाल)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४४

हेलन व्हाईट

हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला
(जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

(Image Credit: Wikipedia)

१९००

मॅक्समुल्लर
१८८३ मधील छायाचित्र

मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत
(जन्म: ६ डिसेंबर १८२३)

(Image Credit: Wikipedia)

१८११

श्रीमंत यशवंतराव होळकर

हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
(जन्म: ३ डिसेंबर १७७६ - पुणे)

(Image Credit: Wikipedia)

१६२७

जहांगीर

मिर्झा नूर-उद-दीन बेग मोहम्मद खान सलीम उर्फ जहांगीर – ४ था मुघल सम्राट
(जन्म: ३० ऑगस्ट १५६९ - फत्तेपूर सिक्री)

(Image Credit: New Delhi Times)



Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 3:01pm