-: दिनविशेष :-

३ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९७१

कतारला स्वातंत्र्य मिळाले.

१९१६

श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांनी ‘होमरुल लीग’ची स्थापना केली.

१७५२

अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६

विवेक ओबेरॉय
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१६

विवेक ओबेरॉय – अभिनेता

(Image Credit: Wikipedia)

१९४०

प्यारेलाल

प्यारेलाल रामप्रसाद शर्मा – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार

(Image Credit:  @Bollywoodirect)

१९३१

दिगंबर त्र्यंबक तथा श्याम फडके – नाटककार (‘काका किशाचा’, ‘तीन चोक तेरा’, ‘राजा नावाचा गुलाम’ फेम)

१९२७

उत्तम कुमार

अरुण कुमार चटर्जी तथा ‘उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते
(मृत्यू: २४ जुलै १९८०)

(Image Credit:  @Bollywoodirect)

१९२३

शाहीर साबळे

कृष्णराव गणपतराव साबळे तथा ‘शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती
(मृत्यू: २० मार्च २०१५)

(Image Credit: मराठी विश्वकोश)

१९२३

किशन महाराज

पं. किशन महाराज – तबला सम्राट. बनारस घराण्याचे तबला वादक. वडिलांकडून त्यांनी आपले शिक्षण सुरु केले. वडिलांच्या मृत्यूपश्चात काका कंठे महाराज यांचे ते शिष्य बनले. वयाच्या ११ व्या वर्षापर्यंतच त्यांची तयारी एवढी झाली होती की ते साथसंगत करू लागले. फैय्याज खान, पं. ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खाँ, पं. भीमसेन जोशी, पं. वसंत राय, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद विलायत खाँ अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ सांगत केली. लयकाऱ्या आणि तिहाया यांत त्यांचा हातखंडा होता. साथसंगत करण्यात ते एकदम वाकबगार होते. गायन, सतार, सरोद, धृपद, धमार, नृत्य अशा सर्व प्रकारात ते साथीला असत. श्री. शंभू महाराज, सितारा देवी, नटराज गोपी कृष्ण, पं. बिरजू महाराज अशा अनेक नृत्यकलेतील दिग्गजांना त्यांनी साथ केली आहे. तबल्याचे सोलो कार्यक्रमही ते करीत. ‘मृदंगम विद्वान’ पालघाट रघू यांच्याबरोबर निर्मिलेली ‘ताल वाद्य कचेरी’ ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री (१९७३), पद्मविभूषण (२००२) अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पं. नंदन मेहता, सुखविंदर सिंग नामधारी, कुमार बोस, विनीत दास, संदीप दास, बाळकृष्ण अय्यर, शुभ महाराज, पूरण महाराज, आनंद महाराज, अरविंद कुमार आझाद हे त्यांचे काही प्रसिद्ध शिष्य आहेत.
(मृत्यू: ४ मे २००८)

(Image Credit: Mystica Music)

१८७५

फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता
(मृत्यू: ३० जानेवारी १९५१)

१८६९

फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ
(मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

१८५५

पंत महाराज बाळेकुन्द्री

दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी तथा पंत महाराज बाळेकुन्द्री – अवधूत नवनाथ संप्रदायाचे आध्यात्मिक गुरू
(मृत्यू: १६ आक्टोबर १९०५)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती

१९६७

समतानंद

अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ‘मौज’ आणि ‘निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला.
(जन्म: १६ आक्टोबर १८९०)

१९५८

माधव केशव काटदरे – निसर्गकवी
(जन्म: ३ डिसेंबर १८९२)

१९५३

खाप्रुमामा पर्वतकर

लक्ष्मण तथा ‘खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये विविध, नावीन्यपूर्ण व आश्चर्यजनक प्रयोग केले आणि तालाच्या जाणकारांमध्ये लौकिक संपादन केला. दिलेल्या मूळच्या लयीत कोणतीही पट ते लीलया करीत असत. त्याचप्रमाणे ते एकाच वेळी एका पायाने त्रिताल, दुसऱ्‍या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्‍या हाताने चौताल धरून तोंडाने सवारीचा ठेका म्हणत असत. तोंडाने विशिष्ट बोलांची तीन आवर्तने करत असतानाच ते त्याच वेळी तबल्यावर पाच वेळा तोच बोल वाजवून दोन्हींची सम अचूक साधत असत आणि हे करताना लयीची यत्किंचितही ओढाताण झालेली दिसून येत नसे. एखादी परण तोंडातून उलटी म्हणत असतानाच तबल्यावर सुलटी वाजवून ते समेवर बरोबर येत. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा ‘परब्रह्म’ ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ ‘धा’ असलेली ‘महासुदर्शन‘ नामक परण बांधली. या त्यांच्या अद‌्भुत व अद्वितीय लयसिद्धीमुळेच त्यांना ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी ‘लयब्रह्मभास्कर’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
(जन्म: ? ? १८८०)

(Image Credit: मराठी विश्वकोश)Pageviews

This page was last modified on 15 October 2021 at 10:35pm