-: दिनविशेष :-

११ ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

२०१३

डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

१९९९

बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.

१९९९

शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

१९९४

अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना ‘विश्वगुर्जरी पुरस्कार’ जाहीर

१९८७

‘युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह‘च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.

१९७९

गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

१९६१

दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

१९६०

चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५२

हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.

१९४३

सी. डी. देशमुख हे ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

१८७७

अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४

यशपाल शर्मा – क्रिकेटपटू

१९४३

जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष

१९२८

विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार
(मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९२८

रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान
(मृत्यू: १ जानेवारी २००९)

१९११

प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी
(मृत्यू: ८ मे १९९५)

१८९७

एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१८

व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक
(जन्म: १७ ऑगस्ट १९३२)

२००३

अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ
(जन्म: २१ मे १९२३)

२०००

पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
(जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

१९९९

रामनाथ पारकर

रामनाथ पारकर – क्रिकेटपटू
(जन्म: ३१ आक्टोबर १९४६)

(Image Credit: ThisDay)

१९७०

इरावती कर्वे – साहित्य अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, ललित निबंधकार. त्यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच ‘परांजपे व्याख्यानमाला’ व ‘हिंदूंची समाजरचना’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. ‘भारतीय संस्कृती’, ‘महाराष्ट्र समाज व संस्कृती’, ‘महाभारत-रामायण’ ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगान्त’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र एक अभ्यास’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ तर ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
(जन्म: १५ डिसेंबर १९०५)

१९०८

खुदिराम बोस – क्रांतिकारक
(जन्म: ३ डिसेंबर १८८९)



Pageviews

This page was last modified on 30 October 2021 at 10:54pm