-: दिनविशेष :-

२९ ऑगस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिन


महत्त्वाच्या घटना:

१९४७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.

१९१८

लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.

१८९८

GoodYear Logo

‘गुडईयर’ कंपनीची स्थापना झाली.

१८३३

युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

१८३१

मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.

१८२५

पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१४९८

वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५८

मायकेल जॅक्सन

मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
(मृत्यू: २५ जून २००९)

(Image Credit: Pop Crush)

१९२३

रिचर्ड अ‍ॅटनबरो

रिचर्ड अ‍ॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
(मृत्यू: २४ ऑगस्ट २०१४)

(Image Credit: MUBI)

१९१५

इन्ग्रिड बर्गमन

इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री
(मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)

(Image Credit: Wikipedia)

१९०५

मेजर ध्यानचंद

मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू
(मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)

(Image Credit: Wikipedia)

१९०१

विठ्ठलराव विखे पाटील
२००२ मध्ये जारी करण्यात आलेले टपाल तिकीट

पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
(मृत्यू: २७ एप्रिल १९८०)

(Image Credit: Wikipedia)

१८८०

बापूजी अणे
२०११ मध्ये जारी करण्यात आलेले टपाल तिकीट

लोकनायक माधव श्रीहरी तथा ‘बापूजी’ अणे – शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, मुत्सद्दी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकीय नेते. ३ ऱ्या लोकसभेतील (१९६२-१९६८) खासदार (नागपूर मतदारसंघ), बिहारचे राज्यपाल (१२ जानेवारी १९४८ - १४ जून १९५२). पद्मविभूषण (१९६८), (मरणोत्तर) साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३). बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ज्या रस्त्यावर आहे त्याला अणे मार्ग असे नाव आहे.
(मृत्यू: २६ जानेवारी १९६८)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

जयश्री गडकर

जयश्री गडकर – अभिनेत्री
(जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ - सदाशिवगड, कारवार, कर्नाटक)

(Image Credit: IMDb)

२००७

बनारसीदास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
(जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)

१९८६

गजानन श्रीपत तथा ‘अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(जन्म: १५ जून १८९८)

१९८२

इन्ग्रिड बर्गमन
The Constant Wife या चित्रपटात

इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री
(जन्म: २९ ऑगस्ट १९१५)

(Image Credit: Wikipedia)

१९७६

काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
 (जन्म: २५ मे १८९९)

१९७५

इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १४ आक्टोबर १८८२)

१९६९

शाहीर अमर शेख

मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ‘शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
(जन्म: २० आक्टोबर १९१६ - बार्शी)

(Image Credit: दैनिक लोकमत)

१९०६

बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक
(जन्म: ? मे १८३१)Pageviews

This page was last modified on 18 October 2021 at 10:13pm