-: दिनविशेष :-

२६ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९९०

रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८४

युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९७३

काँकॉर्ड
१९८६ मधील छायाचित्र

ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ‘काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला. २१८० किमी/तास (ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट) या सर्वाधिक वेगाने हे विमान प्रवास करू शकत असे.

१९६०

फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९५०

इंडोनेशिया

इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

(Image Credit: britannica.com)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

सेरेना विल्यम्स

सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

(Image Credit: Forbes)

१९४३

इयान चॅपेल – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान व प्रशिक्षक

१९३२

डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान (कार्यकाल: २२ मे २००४ ते २६ मे २०१४), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (कार्यकाल: १६ सप्टेंबर १९८२ ते १४ जानेवारी १९८५), योजना आयोगाचे उपाध्यक्ष (१९८५ ते १९८७), अर्थमंत्री (१९९१ ते १९९६), अर्थतज्ञ

१९३१

विजय मांजरेकर
इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथील कसोटी सामन्यात (१९५९)

विजय लक्ष्मण मांजरेकर – क्रिकेटपटू, ‘कट’ आणि ‘हूक’ हे फटके मारण्यात ते पटाईत होते.
(मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)

(Image Credit: Cricket Country / Getty Images)

१९२३

देव आनंद

धरमदेव पिशोरीमल आनंद तथा देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता, पद्मभूषण (२००१), दादासाहेब फाळके पुरस्कार (२००२)
(मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

(Image Credit:  @Bollywoodirect)

१८९४

आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक
(मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

१८८८

टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

१८५८

मणिलाल नभुभाई द्विवेदी

मणिलाल नभुभाई द्विवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते

(मृत्यू: १० आक्टोबर १८९८ - नाडियाद, गुजरात)

(Image Credit: Wikipedia)

१८४९

इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

१८२०

इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.
(मृत्यू: २९ जुलै १८९१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१९

जाक्स शिराक – फ्रान्सचे २२ वे राष्ट्रपती (कार्यकाल: १७ मे १९९५ ते १६ मे २००७), फ्रान्सचे पंतप्रधान (१९७४ - १९७६, १९८६ - १९८८), पॅरिसचे महापौर (१९७७ - १९९५)
(जन्म: २९ नोव्हेंबर १९३२)

२००८

पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
(जन्म: २६ जानेवारी १९२५)

२००२

राम फाटक – गायक व संगीतकार
(जन्म: २१ आक्टोबर १९१७)

१९९६

विद्याधर गोखले – नाटककार व संपादक
(जन्म: ४ जानेवारी १९२४)

१९८९

हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता
(जन्म: १६ जून १९२०)

१९८८

पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व
(जन्म: १ एप्रिल १९१२)

१९७७

उदय शंकर
१९७८ मध्ये केलेले टपाल तिकीट

उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ‘इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली.
(जन्म: ८ डिसेंबर १९०० - उदयपूर, राजस्थान)

१९५६

लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक
(जन्म: २० जून १८६९)

१९०२

लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक
(जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)Pageviews

This page was last modified on 07 December 2021 at 9:01pm