-: दिनविशेष :-

२९ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२०१२

अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००८

‘लेहमन ब्रदर्स’ आणि ‘वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ अंकांनी कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.

१९९१

हैतीमधे लष्करी उठाव

१९६३

‘बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.

१९४१

दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९१७

मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा ‘किंग जॉर्ज हायस्कुल’ सुरू झाली.

१९१६

जॉन डेव्हीसन रॉकफेलर
१८७५ मधील छायाचित्र

जॉन डेव्हीसन रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला जगातील पहिला मनुष्य ठरला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७८

मोहिनी भारद्वाज

मोहिनी भारद्वाज – अमेरिकन कसरतपटू (Gymnast)

(Image Credit: Wikipedia)

१९५७

ख्रिस ब्रॉड
पाकिस्तानविरुद्ध, फैसलाबाद कसोटी (८ डिसेंबर १९८७)

ख्रिस ब्रॉड – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच

(Image Credit: ESPN CricInfo)

१९४३

लेक वॉलेसा

लेक वॉलेसा – नोबेल शांति पुरस्कार विजेते (१९८३)पोलंडचे राष्ट्राध्यक्ष

(Image Credit: The Nobel Prize)

१९३४

लान्स गिब्ज

लान्स गिब्ज – वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज

(Image Credit: ESPN CricInfo)

१९३२

हमीद दलवाई

हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू
(मृत्यू: ३ मे १९७७)

(Image Credit: आपलं महानगर)

१९३२

महमूद

महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता
(मृत्यू: २३ जुलै २००४)

(Image Credit: Cinestaan)

१९२८

ब्रजेश मिश्रा
२००१ मधील छायाचित्र

ब्रजेश मिश्रा – पंतप्रधानांचे (पहिले) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
(मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)

(Image Credit: Wikipedia)

१९२५

डॉ. शरदचंद्र गोखले

डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक, ‘केसरी’चे संपादक, युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
(मृत्यू: १५ जानेवारी २०१३)

(Image Credit: Social Work Foot Prints)

१९०१

एनरिको फर्मी

एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)

(Image Credit: The Nobel Prize)

१८९०

लक्ष्मणशास्त्री गो. तथा नानाशास्त्री दाते – पंचांगकर्ते
(मृत्यू: २५ जानेवारी १९८०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९१

उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक
(जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)

१९१३

रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक
(जन्म: १८ मार्च १८५८)

१८३३

फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा
(जन्म: १४ आक्टोबर १७८४)

८५५

लोथार (पहिला) – रोमन सम्राट
(जन्म: ? ? ७९५)Pageviews

This page was last modified on 28 September 2021 at 8:25pm