मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला’ ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह कायनेटिक होंडा या स्कुटरवरुन पार केली. त्याच्या या कामगिरीची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.
‘अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ‘बुर्किना फासो’ असे करण्यात आले.
भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ‘अप्सरा’ ही भारताची पहिली अणुभट्टी कार्यान्वित झाली.
जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज
(मृत्यू: १९ मार्च २००२)
आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी’ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ‘दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.
(मृत्यू: १३ आक्टोबर १९८७ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते
(मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)
महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान
(मृत्यू: ? ? ????)
सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक. १९१३ मधे ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले.
(मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)
जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ
(मृत्यू: ४ एप्रिल १९२३)
सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (NSD) संचालक (१९६२-१९७७), पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९९१), पद्मविभूषण (२०१०) या पुरस्कारांनी सन्मानित, त्यांनी तुघलक (गिरीश कर्नाड), आषाढ का एक दिन (मोहन राकेश), अंधा युग (धर्मवीर भारती) इ. ५० हुन अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. विजया मेहता, ओम शिवपुरी, ओम पुरी, नासिरुद्दीन शाह, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी हे त्यांचे काही नामांकित शिष्य होत.
(मृत्यू: १८ ऑक्टोबर १९२५)
(Image Credit: Joy Bhattacharjya)
जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)
डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
(जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक
(जन्म: २ एप्रिल १८०५)
हेन्री (पहिला) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ४ मे १००८)
This page was last modified on 17 October 2021 at 8:08pm