महाराष्ट्रात काही गावांच्या नावापुढे ‘दुमाला’ हा प्रत्यय असलेला आढळतो. उदा:- कसारा दुमाला, शिरोली दुमाला इ.
पूर्वी पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठा सरदारांना काही गावांची जहागिरी देण्यात येई. मात्र त्यातील काही गावांवर पूर्णपणे त्या सरदाराचा अधिकार नसे. तर पेशवे व तो सरदार अशा दोघांचा अंमल असे. अशा गावांपुढे ‘दुमाला’ (दोघांची मालकी) असा प्रत्यय लावत असत!
राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रुपांतर झाले.
दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.
प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
मराठा साम्राज्याचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
चंद्राबाबू नायडू – (अविभाजित) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
सईदुद्दीन डागर – धृपद गायकीची परंपरा असलेल्या डागर घराण्यातील १९ व्या पिढीतील गायक.
(मृत्यू: ३० जुलै २०१७)
(Image Credit: दिव्यमराठी)
गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक
(मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
ह. भ. प. शंकर वामन तथा ‘सोनोपंत’ दांडेकर – पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य, तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते
(मृत्यू: ९ जुलै १९६८)
अॅडॉल्फ हिटलर – बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ब्रानाउ आम इन या गावी सकाळी साडे सहा वाजता नाझी हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. तो आपल्या बापाच्या तिसऱ्या लग्नसंबंधापासून झालेला तिसरा मुलगा होता.
(मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
आदि शंकराचार्य [वैशाख शु. १० शके ७१०]
(मृत्यू: ? ? ८२०)
महेंद्रसिंह पेशवे – थोरले बाजीराव पेशवे यांचे नववे वंशज, हिंदवी स्वराज महासंघाचे कार्याध्यक्ष, वाराणसीच्या अन्नपूर्णा ट्रस्टचे विश्वस्त, हिरे व रत्नपारखी
(जन्म: ?? ?? १९६४)
(Image Credit: The Democratic Times)
(Image Credit: Bytes of India)
कमलाबाई कृष्णाजी ओगले – ‘रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)
(Image Credit: rekhta.org)
शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर
(जन्म: ३ ऑगस्ट १९१६ - बदायूँ, उत्तर प्रदेश)
अमल ज्योती तथा ‘पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
(जन्म: २४ जुलै १९११)
‘भारताचार्य’ चिंतामणराव विनायक वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार’ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य’ ही पदवी दिली. १८८९ ते १९३४ या काळात वैद्यांनी सुमारे ५०,००० पृष्ठे इतके विपुल लेखन इंग्रजी-मराठीत केले.
(जन्म: १८ आक्टोबर १८६१)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ६ जून १८५०)
This page was last modified on 17 October 2021 at 1:13pm