-: दिनविशेष :-

२६ ऑक्टोबर


महत्त्वाच्या घटना:

१९९९

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर

१९९४

जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

१९६२

‘धी गोवा हिन्दू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९०५

नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४

रवीना टंडन

रवीना टंडन – अभिनेत्री

(Image Credit: Filmfare)

१९४७

हिलरी क्लिंटन
१९९२ मधील छायाचित्र

हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री

(Image Credit: Wikipedia)

१९३७

हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक

१९१९

मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण
(मृत्यू: २७ जुलै १९८०)

१९१६

फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

१९००

इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक
(मृत्यू: ७ मार्च १९९३)

१८९१

वैकुंठ मेहता

वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक
(मृत्यू: २७ आक्टोबर १९६४ - पुणे)

(Image Credit: VAMNICOM)

१२७०

संत नामदेव
(मृत्यू: ३ जुलै १३५०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९१

अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, ‘दैनिक मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग
(जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

१९७९

चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली.
(जन्म: ? ? ????)

१९३०

डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(जन्म: १५ मार्च १८६०)

१९०९

इटो हिरोबुमी
१००० येन ची नोट

इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान
(जन्म: १६ आक्टोबर १८४१)

(Image Credit: Wikipedia)Pageviews

This page was last modified on 26 October 2021 at 11:50pm