-: दिनविशेष :-

३ जून

जागतिक सायकल दिन

World Bicycle Day

मुंबईत ज्याप्रमाणे सचिवालय आहे त्याचप्रमाणे पेशव्यांच्या काळात राजधानी पुण्यातही सचिवालय होते. ते ‘फड’ म्हणून ओळखले जाई. पुण्यातील फडात पंधराशे कारकुन काम करत. पेशवेकालीन मराठी साम्राज्यात सर्व फडांमधे काम करणार्‍या कारकुनांची एकूण संख्या होती वीस हजार!

महत्त्वाच्या घटना:

१९९८

जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्‍या ‘त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची ‘द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी

१९८४

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

१९५०

अन्‍नपूर्णा

मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी ‘अन्‍नपूर्णा’ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

(Image Credit: Wikipedia)

१९४७

हिन्दूस्तानच्या फाळणीची ‘मांउंटबॅटन योजना’ जाहीर झाली.

१९४०

दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.

१९१६

महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

१८१८

मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. [वैशाख व. ३०, शके १७४०]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६

वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज

१९६०

सारिका

सारिका ठाकूर तथा सारिका – चित्रपट अभिनेत्री, वेशभूषाकार, ध्वनी तंत्रज्ञ, सहाय्यक दिग्दर्शक.

(Image Credit:  Cinemaazi)

१९२४

एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
(मृत्यू: ७ ऑगस्ट २०१८)

१८९५

सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित
(मृत्यू: १० डिसेंबर १९६३)

१८९२

आनंदीबाई शिर्के

आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
(मृत्यू: ३१ आक्टोबर १९८६)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

१८९०

बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ‘कलामहर्षी‘
(मृत्यू: १६ जानेवारी १९५४)

१८६५

जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २० जानेवारी १९३६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२१

अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
(जन्म: २९ मार्च १९३०)

२०१६

मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
(जन्म: १७ जानेवारी १९४२)

२०१०

अजय सरपोतदार

अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
(जन्म: १६ आक्टोबर १९५९)

(Image Credit: Times Content)

१९९७

मीनाक्षी शिरोडकर

रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ‘यमुनाजळी खेळू ...’ या गाण्यासाठी प्रसिद्ध
(जन्म: ११ आक्टोबर १९१६)

(Image Credit: My Words & Thoughts)

१९५६

वामन गोपाळ तथा ‘वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ‘राष्ट्रमत’ आणि ‘स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार. त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत.
(जन्म: १८ मार्च १८८१)

१९३२

सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (philanthropist)
(जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

१६५७

विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
(जन्म: १ एप्रिल १५७८)



Pageviews

This page was last modified on 30 October 2021 at 11:52pm