-: दिनविशेष :-

२० नोव्हेंबर

लोकशिक्षण दिन

World Children’s Day


महत्त्वाच्या घटना:

२००८

अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

१९९९

अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘हॅरी होल्ट पुरस्कार’ लता जोशी यांना जाहीर.

१९९९

आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर

१९९८

‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.

१९९७

अमेरिकेच्या ‘कोलंबिया’ या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय वंशाची अमेरिकन महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

१९९४

ऐश्वर्या राय

भारताची ऐश्वर्या राय ‘मिस वर्ल्ड’ किताबाची मानकरी बनली.

(Image Credit: missworld.com)

१९४५

न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

१९१७

युक्रेन प्रजासत्ताक बनले.

१७८९

न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३९

वसंत पोतदार – मराठी साहित्यिक (३० एप्रिल २००३ - नाशिक)

१९२९

मिल्खा सिंग – ‘द फ्लाइंग सिख’
(मृत्यू: १८ जून २०२१)

१९२७

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण

१९०५

मिनोचर रुस्तुम तथा ‘मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते
(मृत्यू: २७ मे १९९८)

१८८९

एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
(मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

१७५०

शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ ‘टिपू सुलतान’ – हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ
(मृत्यू: ४ मे १७९९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

दत्ता महाडिक पुणेकर – तमाशा कलावंत (सोंगाड्या)
(जन्म: ? ? ????)

१९९८

दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी – संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक
(जन्म: ? ? ????)

१९९७

शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक (कोणतेही नाते नव्हते), हिन्दू महासभेचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)

१९८९

हिराबाई बडोदेकर

‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि ताराबाई माने यांची कन्या. ख्याल, ठुमरी, गज़ल आणि भजन गायिका. ‘पुण्यप्रभाव’, ‘सौभद्र’, ‘विद्याहरण’, ‘युगांतर’ आदी नाटकांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. १९७० मधे त्यांना ‘विष्णूदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री लाल किल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात ‘वंदे मातरम’ हे (त्यावेळचे) राष्ट्रगीत गाण्याचा मान त्यांना मिळाला.
(जन्म: २९ मे १९०५ - बडोदा)

(Image Credit: sarangi.info)

१९८४

फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
(जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

१९७३

केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते
(जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

१९७०

यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी
(जन्म: १४ जुलै १८८४)

१९१०

लिओ टॉलस्टॉय
२० वर्षांचा असताना (१८४८)

लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक
(जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

(Image Credit: Wikipedia)

१८५९

माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन

माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला.
(जन्म: ६ आक्टोबर १७७९)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 05 October 2021 at 8:11pm