-: दिनविशेष :-

१९ जून


महत्त्वाच्या घटना:

१९९९

‘मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

१९८९

इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७७

ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९६६

‘शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

१९६१

कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९१२

अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१८६२

अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.

१६७६

शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

राहूल गांधी – लोकसभा खासदार, काँग्रेसचे (INC) सरचिटणीस

१९४७

सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक

१९४५

आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी? नेत्या

१८७७

डॉ. पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ
(मृत्यू: ? ? ????)

१६२३

ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील (अपराध मीच केला) व चित्रपट अभिनेत्री (ये रे माझ्या मागल्या, माझा होशील का?, वाट चुकलेले नवरे, गाठ पडली ठका ठका, देवाघरचं लेणं, नवरा म्हणू नये आपला, पहिलं प्रेम, दोन घडीचा डाव, आंधळा मागतो एक डोळा, तलाक, संतान, मिया बिबी राजी, स्कूल मास्टर, माँ बाप, सपने सुहाने, धर्मपत्‍नी), व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांची मेहुणी, अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले आहे.
(जन्म: ? ऑगस्ट १९३३)

१९९८

रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
(जन्म: ६ जानेवारी १९२५)

१९९६

कमलाबाई पाध्ये – समाजसेविका
in(जन्म: ? ? ????)

१९९३

विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक
(जन्म: १९ सप्टेंबर १९११)

१९५६

थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष
(जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)

१७४७

नादिर शहा – पर्शियाचा सम्राट
(जन्म: २२ आक्टोबर १६९८)



Pageviews

This page was last modified on 22 May 2021 at 7:43pm